Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अमेरिकेच्या मंत्र्यांच्या निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या

न्यूयार्क : अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये उच्चपदस्थ नेतृत्वाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. परराष्ट्र मंत्री मार्को

रावसाहेब दानवेंच्या सभेत पत्रकबाजी… धनगर आरक्षणावरून युवकांनी विचारला जाब
वृक्ष वेद फाउंडेशन व वृक्षमित्र संघटनेच्या वतीने वृक्षारोपण
जायनावाडीत जागतिक आदिवासी दिन उत्साहात

न्यूयार्क : अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये उच्चपदस्थ नेतृत्वाच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्‍न निर्माण करणारी घटना समोर आली आहे. परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांच्या निवासस्थानाजवळ संशयास्पद ड्रोन फिरताना आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर तातडीच्या बैठका घेण्यात येत असून, संबंधित नेत्यांच्या स्थलांतराचाही विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.
वॉशिंग्टनमधील फोर्ट लेस्ली मॅकनेअर या महत्त्वाच्या लष्करी तळावर गेल्या काही दिवसांत रात्रीच्या वेळी वारंवार ड्रोन दिसल्याची नोंद झाली आहे. या ड्रोनची ओळख अद्याप पटलेली नसून ते कुठून येत आहेत, याबाबतही अनिश्‍चितता आहे. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेने संभाव्य धोक्याच्या दृष्टीने अधिक कडक भूमिका घेतली आहे. अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात केलेल्या कारवायांनंतर आधीच जागतिक तणाव वाढलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर अशा प्रकारच्या ड्रोन हालचालींना अधिक गंभीरतेने पाहिले जात आहे. परिणामी, व्हाईट हाऊस येथे उच्चस्तरीय आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली. या घटनेनंतर अमेरिकेने जगभरातील आपल्या दूतावासांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. विशेषतः आखाती प्रदेशातील तणाव लक्षात घेता, दूतावास आणि लष्करी तळांवरील सुरक्षा पातळी वाढवण्यात आली आहे. न्यू जर्सीमधील जॉइंट बेस मॅकगायर-डिक्स-लेकहर्स्ट आणि फ्लोरिडामधील मॅकडिल एअर फोर्स बेस येथे सुरक्षा पातळी ‘चार्ली’पर्यंत नेण्यात आली आहे. ही पातळी संभाव्य हल्ल्याचा धोका अत्यंत जवळ असल्याचे सूचित करते. मॅकडिल तळ, जिथे अमेरिकेची मध्यवर्ती लष्करी कमांड कार्यरत आहे, तेथेही सलग दोन वेळा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवावे लागले. संशयास्पद वस्तू आढळल्याने अभ्यागत केंद्र बंद करण्यात आले, तर दुसर्‍या घटनेत तातडीने स्थलांतराचे आदेश देण्यात आले.

COMMENTS