Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

प.बंगालमध्ये भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर; 144 उमेदवारांना संधी, सुवेंदू अधिकारी दोन मतदारसंघातून लढणार

नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम बंगालसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असू

पाच राज्यांच्या निवडणुका घोषित; पश्चिम बंगालमध्ये चुरस!
लोणी परिसरात सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित; २० चौकांत ८८ तर कोल्हारमध्ये ३३ कॅमेरे
माहिती अधिकाराच्या माहितीप्रकरणी आंदोलनाचा इशारा

नवी दिल्ली/तिरुवनंतपुरम : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाने पश्‍चिम बंगालसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून त्यात 144 जणांना संधी देण्यात आली आहे. या यादीत पक्षाने सुवेंदू अधिकारी यांना नंदीग्राम आणि भवानीपूर या दोन्ही महत्त्वाच्या मतदारसंघांतून उमेदवारी देत राजकीय समीकरणांमध्ये मोठी चुरस निर्माण केली आहे.
नंदीग्राम आणि भवानीपूर हे पश्‍चिम बंगालच्या राजकारणातील अत्यंत चर्चेतील मतदारसंघ मानले जातात. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकीय भवितव्य या दोन्ही मतदारसंघांशी जोडले गेले असल्याने या ठिकाणी होणारी लढत विशेष लक्षवेधी ठरणार आहे. मागील विधानसभा निवडणुकीत नंदीग्राम येथे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचा पराभव केला होता. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी भवानीपूर येथून पोटनिवडणूक जिंकून मुख्यमंत्रीपद कायम ठेवले होते. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांतील लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. भाजपने केरळमधील विधानसभा निवडणुकीसाठीही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून 140 पैकी 47 मतदारसंघांसाठी उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. पक्षाने राज्याध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांना नेमोम मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत तिरुवनंतपुरम मतदारसंघातून त्यांचा पराभव काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांच्याकडून झाला होता. याशिवाय के. सुरेंद्रन यांना मंजेश्‍वर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. नव्या हरिदास यांना कोझिकोड उत्तर मतदारसंघातून संधी देण्यात आली असून डव्होकेट जॉर्ज कुरियन यांना कंजिरापल्ली आणि व्ही. मुरलीधरन यांना काझाकूट्टम मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिली आहे.

COMMENTS