Homeताज्या बातम्यादेश

चीनमध्ये आयफोनच्या वापरावर येणार बंदी

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतासह जगातील अनेक देशांमध्ये आयफोनचा वापर वाढत असतानाच आता चीनी सरकारने धक्कादायक निर्णय घेत खळबळ उडवून दिली आहे. चीनमध्

प्रक्षोभक वक्तव्य करणार्‍या आंदोलकांवर गुन्हा दाखल ; नगरच्या पोलिसांनी केली कारवाई
इच्छामरणाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचे ‘सर्वोच्च’ संकेत
ठाण्यात मनोरुग्णालयाच्या बाहेर संजय राऊत यांच्या विरोधात शिंदे गटाचे आंदोलन 

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः भारतासह जगातील अनेक देशांमध्ये आयफोनचा वापर वाढत असतानाच आता चीनी सरकारने धक्कादायक निर्णय घेत खळबळ उडवून दिली आहे. चीनमध्ये सरकारी एजन्सी आणि कंपन्यांमध्ये आयफोनच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक सरकारी तसेच खाजगी कर्मचार्‍यांना ऑफिसमध्ये आयफोन आणण्यास मज्जाव करण्यात येत आहे. येत्या काळात चीनी सरकारकडून अ‍ॅपल कंपनीच्या स्मार्टफोन्सवरील निर्बंध अधिक कडक केले जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता अमेरिका आणि अ‍ॅपल कंपनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
चीनी सरकारने याबाबतचा कोणताही लिखित आदेश अद्याप काढलेला नाही. परंतु सरकारी कार्यालयं आणि खाजगी कंपन्यांमध्ये अ‍ॅपल कंपनीच्या स्मार्टफोन्स वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे. चीनमधील कम्यूनिस्ट सरकार गेल्या अनेक वर्षांपासून परदेशी तंत्रज्ञान आणि अ‍ॅप्सवर बंदी घालत आहे. विदेशी तंत्रज्ञानावरील परावलंबन कमी करून स्वदेशी तंत्रज्ञानावर चीनी सरकारकडून अधिक जोर देण्यात येत आहे. सॉफ्टवेयर आणि सर्किट्सही चीनमध्ये तयार करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. विशेषत: अमेरिकेतील तंत्रज्ञान, वस्तू आणि सेवांवर चीनमध्ये सातत्याने बंधने घालण्यात येत आहे. अ‍ॅपल कंपनीसाठी चीन ही सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अ‍ॅपल कंपनीच्या माध्यमातून चीनी सरकारला मोठा महसूल मिळत असतो. परंतु आता चीनकडून अ‍ॅपल कंपनीच्या स्मार्टफोन्सवर बंदी घालण्यात येत असल्याने त्यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. चीनमध्ये आयफोनच्या वापरावर बंदी घालण्यात येत असल्याची माहिती समोर येताच अ‍ॅपल कंपनीचे शेयर्स 2.9 टक्क्यांनी घसरले आहे. केवळ दोन दिवसांत कंपनीने 200 बिलियन डॉलर्सचे व्हॅल्यूएशन गमावले आहे. त्यामुळे आता चीनी सरकारच्या एका अलिखित निर्णयामुळे अ‍ॅपल कंपनीला मोठा तोटा सोसावा लागत आहे. याशिवाय अ‍ॅपल कंपनीवर बंधने घालून हुवावे कंपनीच्या उत्पादनांना प्राधान्य देण्याचा चीनी सरकारचा विचार असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अमेरिकन सरकारने हुवावे कंपनीची चौकशी सुरू केली होती. त्यामुळेच आता चीनने अमेरिकेच्या अ‍ॅपलवर बंधने घालून प्रत्युत्तर दिल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS