Homeताज्या बातम्यामनोरंजन

सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच

येत्या १२ जानेवारी २०२४ पासून जवळच्या सिनेमागृहात

सत्तेसाठीची लढाई रंगणार", संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत, 'आराध्या मोशन फिल्म्स' आणि 'योगआशा फिल्म्स' निर्मिती संस्थेतर्फे संतोष कुसुम हगवणे, योगिता

तिघा मित्रांनी मिळून केली युवकाची चाकू भोकसून हत्या I LOKNews24
उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत सहभाग घ्यावा
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ

सत्तेसाठीची लढाई रंगणार”, संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत, ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योगआशा फिल्म्स’ निर्मिती संस्थेतर्फे संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी, प्रदीप नत्थीसिंग नागर निर्मित आणि शिव धर्मराज माने व संतोष हगवणे दिग्दर्शित ‘खुर्ची’ सिनेमा येतोय येत्या १२ जानेवारी पासून चित्रपटगृहात सध्या बॉक्स ऑफिसवर मराठी चित्रपट धुमाकूळ घालताना दिसत आहेत. अशातच नववर्षाचं स्वागत करायला  रोमँटिक, ऍक्शनचा भरणा असलेला एक चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सज्ज होत आहे. ‘सत्ता कुणाची पण असो, आता खुर्ची आपलीच’असं म्हणत प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा ‘खुर्ची’ हा चित्रपट आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. येत्या १२ जानेवारी २०२४ला हा सिनेमा रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. या चित्रपटाचा टिझर आल्यापासून खुर्चीचं राजकारण पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढून राहिली होती. आता या उत्सुकतेला लवकरचं पूर्णविराम मिळणार आहे. 

संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’,’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. डॉ. अमित बैरागी आणि आतिश अंकुश जवळकर यांची सहनिर्मिती असून राजकारणाचे विविध रंग या चित्रपटात रेखाटण्यात आले आहे.  या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे यांची असून दिग्दर्शक शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा उत्तमरीत्या पेलवली आहे. राहुल रामपाल या चित्रपटाचे सहदिग्दर्शन करत आहेत. तर, क्रिएटिव्ह हेड म्हणून प्रतिक वसंतराव पाटील यांनी बाजू सांभाळली आहे. चित्रपटाच्या छायाचित्रणाची जबाबदारी योगेश कोळी यांनी सांभाळली आहे.

चित्रपटाची गाणी प्रशांत प्रशांत मडपूवार, सनकी स्वरर्भ व संजय शिंदे लिखित असून सन्मित वाघमारे, अभिषेक काटे यांनी गाण्यांना संगीत दिले आहे. या चित्रपटातील गाणी आदर्श शिंदे, अवधूत गुप्ते, अभय जोधपुरकर, रसिका वाखरकर, अमिता घुगरी आणि आर्यन यांनी त्यांच्या सुमधुर स्वरात स्वरबद्ध केली आहेत. तर संगीताची धुरा अभिषेक काटे आणि सन्मीत वाघमारे याने उत्तमरीत्या पेलवली आहे. तर म्युझिक अरेंजर म्हणून अमोघ इनामदार याने उत्तम काम केलं आहे.

‘खुर्ची’ या बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपटात राकेश बापट, अक्षय वाघमारे,आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घाग, अभिनेत्री प्रीतम कागणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले यांनी ही चित्रपटात दमदार भूमिका साकारली आहे.’खुर्ची’ हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजेच १२ जानेवारी २०२४ मध्ये येणार असून ‘खुर्ची’चं राजकारण पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ वाट बघावी लागणार आहे.

COMMENTS