Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नेहरू विद्यालयाला साऊंड सिस्टिम भेट

श्रीगोंदा : आढळगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाला आढळगावचे भूमिपुत्र आणि पुण्यातील नामवंत उद्योजक, आयप्लॅनेट क्लाऊड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा आनंदजी जगदाळे यांच्या वतीने साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यालयातील शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठी मदत होणार आहे. आढळगाव ग्रामपंचायतचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विद्यालयातील शिक्षक बापू काळे व शेळके  यांनी विद्यालयाला साऊंड सिस्टिमची अत्यंत गरज असल्याचे सांगत ती मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली. यावेळी सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी आढळगावचे भूमिपुत्र उद्योजक आनंदजी जगदाळे यांच्याशी संपर्क साधून विद्यालयासाठी साऊंड सिस्टिम देण्याची विनंती केली. जगदाळे यांनी कोणताही विलंब न लावता विद्यालयाकडून कोटेशन मागवून घेतले आणि अवघ्या आठ दिवसांत साऊंड सिस्टिमचे साहित्य विद्यालयात पोहोचवले. त्यांच्या या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.  सरपंच शिवप्रसाद उबाळे, पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव भैलूमे, माजी सरपंच नानासाहेब बोळगे, सोसायटीचे माजी चेअरमन दत्ता  चव्हाण, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ सूर्यवंशी, संचालक ज्ञानदेव गाढवे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत डोके, पत्रकार अमोल गव्हाणे, सत्यवान शिंदे, जावेद इनामदार, सागर वाकडे, चक्रधर गव्हाणे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य राम भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य गदादे यांच्याकडे साऊंड सिस्टिम सुपूर्द करण्यात आली.

महिलांसह नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी रक्षक दल; संगमनेर नगरपरिषदेचा निर्णय ; महाराष्ट्रात प्रथमच रक्षकदल कार्यान्वित
तीन वर्षांत गुन्हेगारीवर मोठा लगाम; श्रीगोंदा पोलिसांची धडक कारवाई; २८७६ गुन्हे दाखल, २३९८ गुन्ह्यांची उकल
रमजाननिमित्त खजूर वाटप; सर्वधर्म समभावाचा संदेश

श्रीगोंदा : आढळगाव येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाला आढळगावचे भूमिपुत्र आणि पुण्यातील नामवंत उद्योजक, आयप्लॅनेट क्लाऊड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा आनंदजी जगदाळे यांच्या वतीने साऊंड सिस्टिम भेट देण्यात आली. या उपक्रमामुळे विद्यालयातील शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठी मदत होणार आहे.

आढळगाव ग्रामपंचायतचे सरपंच शिवप्रसाद उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयात विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विद्यालयातील शिक्षक बापू काळे व शेळके  यांनी विद्यालयाला साऊंड सिस्टिमची अत्यंत गरज असल्याचे सांगत ती मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना केली.

यावेळी सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी आढळगावचे भूमिपुत्र उद्योजक आनंदजी जगदाळे यांच्याशी संपर्क साधून विद्यालयासाठी साऊंड सिस्टिम देण्याची विनंती केली. जगदाळे यांनी कोणताही विलंब न लावता विद्यालयाकडून कोटेशन मागवून घेतले आणि अवघ्या आठ दिवसांत साऊंड सिस्टिमचे साहित्य विद्यालयात पोहोचवले. त्यांच्या या सहकार्याबद्दल ग्रामस्थांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 सरपंच शिवप्रसाद उबाळे, पंचायत समितीचे माजी सभापती विलासराव भैलूमे, माजी सरपंच नानासाहेब बोळगे, सोसायटीचे माजी चेअरमन दत्ता  चव्हाण, शिवसेनेचे तालुका उपाध्यक्ष रघुनाथ सूर्यवंशी, संचालक ज्ञानदेव गाढवे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत डोके, पत्रकार अमोल गव्हाणे, सत्यवान शिंदे, जावेद इनामदार, सागर वाकडे, चक्रधर गव्हाणे, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य राम भालेराव आदी मान्यवरांच्या हस्ते विद्यालयाचे प्राचार्य गदादे यांच्याकडे साऊंड सिस्टिम सुपूर्द करण्यात आली.

COMMENTS