Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवोदय प्रवेश परीक्षेत ‘श्री संत वामनभाऊ’च्या दोन विद्यार्थ्यांची निवड

शेवगाव : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच वडुले खुर्द येथील श्री संत वामनभाऊ विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतील सार्थक सोपान आव्हाड व अरहान तौफिक शेख यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. १३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या प्रवेश परीक्षेचा निकाल १७ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला. यामध्ये सार्थक आव्हाड यांनी १०० पैकी ९६.२५ गुण, तर अरहान शेख यांनी ९७.५० गुण मिळवत अंतिम गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.  या यशाबद्दल विद्यालयात विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किसन चव्हाण होते. यावेळी सोपान आव्हाड, तौफिक शेख, रामभाऊ पवार, सुभाष पवार, संतोष शेळके, कावेरी आव्हाड आदी उपस्थित होते. या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दोन विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे. इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सार्थक जगदीश तुपे (९१.२५ गुण), श्रावणी रामेश्वर पवार (९३.७५ गुण), विश्वजीत जयसिंग काळे (९० गुण), रोहन भीमा गायकवाड (८७ गुण) व समृद्धी नामदेव आव्हाड (८८.७५ गुण) यांचा समावेश आहे. सुनिता चव्हाण, एकनाथ पवार, महादेव मगरे, गणेश वाणी, प्रतीक्षा वांढेकर व गणेश भालसिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील, माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, सरपंच भाऊसाहेब आव्हाड, प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, उमेश भालसिंग व मुख्याध्यापक किसन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

आंबीजळगावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; दोन घरांवर दरोडा, ५८ हजारांचा ऐवज लंपास
कोपरगावमध्ये 48 घरकुलांना मंजुरी : नगराध्यक्ष संधान
श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

शेवगाव : जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होताच वडुले खुर्द येथील श्री संत वामनभाऊ विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता पाचवीतील सार्थक सोपान आव्हाड व अरहान तौफिक शेख यांची नवोदय विद्यालयासाठी निवड झाली.

१३ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या प्रवेश परीक्षेचा निकाल १७ मार्च २०२६ रोजी जाहीर झाला. यामध्ये सार्थक आव्हाड यांनी १०० पैकी ९६.२५ गुण, तर अरहान शेख यांनी ९७.५० गुण मिळवत अंतिम गुणवत्ता यादीत स्थान पटकावले.

 या यशाबद्दल विद्यालयात विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किसन चव्हाण होते. यावेळी सोपान आव्हाड, तौफिक शेख, रामभाऊ पवार, सुभाष पवार, संतोष शेळके, कावेरी आव्हाड आदी उपस्थित होते.

या परीक्षेसाठी विद्यालयातील एकूण २२ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून दोन विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे. इतर यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये सार्थक जगदीश तुपे (९१.२५ गुण), श्रावणी रामेश्वर पवार (९३.७५ गुण), विश्वजीत जयसिंग काळे (९० गुण), रोहन भीमा गायकवाड (८७ गुण) व समृद्धी नामदेव आव्हाड (८८.७५ गुण) यांचा समावेश आहे. सुनिता चव्हाण, एकनाथ पवार, महादेव मगरे, गणेश वाणी, प्रतीक्षा वांढेकर व गणेश भालसिंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आ. डॉ. नरेंद्र घुले पाटील, माजी आ. चंद्रशेखर घुले पाटील, माजी सभापती डॉ. क्षितिज घुले, सरपंच भाऊसाहेब आव्हाड, प्रशासकीय अधिकारी के. वाय. नजन, उमेश भालसिंग व मुख्याध्यापक किसन चव्हाण यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

COMMENTS