Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उप अभियंता नंदकुमार पाटलांची बदली होऊनही पदभार सोडेना ? 8 कोटींच्या अ‍ॅडजेस्टमेंट बिलांसाठी पदभार न सोडण्याचा अट्टाहास सुरू

मुंबई : सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक -2 चे उपअभियंता नंदकुमार पाटील यांची 29 ऑक्टोबर 2025 रोजी शासन आदेश क्रमांक एलटीएस -2025/प्र.125सेवा/-2

किनवट पालिकेचा अजब कारभार!35 लाखांची शववाहिनी धुळखात; नऊ महिन्यांपासून प्रशासनाला पडलाय ’विसर’
अ. भा.मराठी पत्रकार परिषदेचे 44 वे राष्ट्रीय अधिवेशन 18,19 एप्रिल रोजी उदगीर येथे होणार; मुख्यमंत्री येणार : बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष
सोशल मीडियावर बदनामी पडणार महागात; राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन

मुंबई : सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक -2 चे उपअभियंता नंदकुमार पाटील यांची 29 ऑक्टोबर 2025 रोजी शासन आदेश क्रमांक एलटीएस -2025/प्र.125सेवा/-2 या आदेशानुसार त्यांची मुख्य अभियंता राष्ट्रीय महामार्ग (सार्वजनिक बांधकाम विभाग) कोकण उपविभाग येथे बदली करण्यात आलेली आहे. असे असतांना देखील त्यांनी साडेचार महिन्यांचा कालावधी संपूनही आपला पदभार सोडलेला नाही.
नंदकुमार पाटील यांनी पदभार न सोडण्याचे प्रमुख कारण म्हणजे सुमारे 8 कोटींचे अ‍ॅडजेस्टमेंटचीी बोगस देयके काढण्यासाठी त्यांचा जीव अडकलेला असल्याचे दिसून येत आहे. 8 कोटींचे बोगस कामकाजाच्या नोंदी असून त्याची बोगस देयके काढण्यासाठी त्यांचा अट्टाहास सुरू असल्याचे दिसून येत आहे. मोजमाप बिलाच्या बोगस नोंदी करून त्यांनी या बिलाच्या रकमा काढण्यासाठी अट्टाहास सुरू ठेवला असून, त्यामुळेच ते आपला पदभार सोडतांना दिसून येत नाही. एकंदरितच शासन निर्णयाची उप अभियंता नंदकुमार पाटील यांच्याकडून अवहेलना सुरू असून, आपण कुणालाच जुमानत नसल्याचे नंदकुमार पाटील अप्रत्यक्षपणे सांगत शासन निर्णयालाच आव्हान देतांना दिसून येत आहे. याप्रकरणी कार्यकारी अभियंता स्वाती पाठक यांनी या संपूर्ण भ्र्रष्टाचाराची दखल घेत, कसून चौकशी करूनच देयके अदा करावी.

दैनिक लोकमंथनची मुख्य अभियंत्यांकडे तक्रार
उप अभियंता नंदकुमार पाटील यांच्या भ्रष्टाचाराची आणि शासन निर्णयाची अवहेलना केल्याबदद्ल त्यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी अशी मागणी दैनिक लोकमंथनने शुक्रवारी 13 मार्च रोजी मुख्य अभियंता, मुंबर्ई, सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

लाचलुवत आणि आर्थिक गुन्हे शाखेने करावी चौकशी
उप अभियंता नंदकुमार पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कामांची आणि त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची तसेच त्यांच्या ज्ञात-अज्ञात संपत्तीची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी करण्याची मागणी दैैनिक लोकमंथनने केलेल्या तक्रारीत यापूर्वीच केली आहे.

सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्तांत
बीडीडी चाळीत शाखा अभियंता
यश थोरात, मनोज पाटलांचा भ्रष्टाचाराचा धुडगूस

बीडीडी चाळीतील कामांमध्ये शाखा अभियंता यश थोरात, मनोज पाटील यांनी मोठ्या प्रमाणांवर गैरव्यवहार करत भ्रष्टाचाराचा धुडगूस घातला आहे, शिवाय त्याचे खापर वरिष्ठांवर फोडून दोन्ही शाखा अभियंता नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतांना दिसून येत आहे. या दोन्ही अधिकार्‍यांनी नियमबाह्य कामकाजांचा कच्चाचिठ्ठा आमच्याजवळ आला असून, त्यांनी ऑफ लाईन आणि सीआरच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करत कोटयावधींचा निधी हडप केला आहे. याप्रकरणात तत्कालीन कार्यकारी अभियंता महेेंद्र पाटील यांचा त्यांना वरदहस्त असल्यामुळे त्यांनी भ्रष्टाचाराचा नंगानाच या विभागात चालवला असून, त्यांनी आपल्या वरिष्ठांना अंधारात ठेवून मोठा गैरव्यवहार केला आहे, त्याचा सविस्तर वृत्तांत सोमवारच्या अंकात.

COMMENTS