Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिक्रापुरात चोरीच्या उद्देशाने आलेले दोघे पोलिसांच्या ताब्यात

शिक्रापूर : शिक्रापूर, ता. शिरुर परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले असून राहुल राम राठोड

अबब..! रवींद्र नाट्य मंदिराच्या फक्त नुतनीकरणावर 250 कोटींचा खर्च; इतका मोठा निधी कुठे आणि कसा खर्च केला, याचे उत्तर उपअभियंता अजय बापट देणार का?बापटांचा डीपीडीसीच्या 7 कोटींचे कामे विकण्याचा घाट का ?
मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना
जय पवार मांडणार अजितदादांच्या अपघातावर भूमिका

शिक्रापूर : शिक्रापूर, ता. शिरुर परिसरात चोरीच्या उद्देशाने आलेल्या दोघांना शिक्रापूर पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हे दाखल केले असून राहुल राम राठोड व योगेश शंकर सारगे असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या युवकांची नावे आहे. शिक्रापूर, ता. शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार अमोल दांडगे, नारायण वाळके, योगेश आव्हाड हे सायंकाळच्या सुमारास परिसरात चोर्‍या रोखण्याच्या हेतूने गस्त घालत होते. त्यावेळी शिक्रापूर चाकण रोड येथील जुना टोलनाका येथे दोन इसम संशयितपणे फिरत असल्याचे पोलिसांना दिसले. छोलीस त्यांच्या जवळ जाऊ लागताच दोघे पळून जाऊ लागल्याने पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे दोघे चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याबाबत पोलीस शिपाई नारायण चंद्रकांत वाळके (रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी राहुल राम राठोड (वय 22, सध्या रा. कोरेगाव भीमा, ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. बसवनगर ता. बसवकल्याण जि. बिदर कर्नाटक) व योगेश शंकर सारगे (वय 19, सध्या रा. कोरेगाव भीमा ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. कासार बालकुंदा ता. निलंगा जि. लातूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करपे हे करत आहे.

COMMENTS