Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सेंट मेरी चर्चच्या वतीने ‘सन्मान नारी शक्तीचा’ कार्यक्रम

देवळाली प्रवरा : जागतिक महिला दिनानिमित्त (दि. ८) सेंट मेरी कॅथोलिक चर्च, देवळाली प्रवरा येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रविवारी नियोजित मिसा पार पडली. त्यानंतर सेंट मेरी युवक मंडळाच्या वतीने आयोजित ‘सन्मान नारी शक्तीचा’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फादर प्रकाश राऊत, सिस्टर अर्चना, सिस्टर हिल्डा, नगरसेविका सुवर्णा कोठुळे व नगरसेविका सिंधु वाळुंज उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजना रावजी पंडित यांनी स्थान भूषविले. यावेळी उपस्थित सर्व महिलांचा पुष्पगुच्छ व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. महिला सन्मान कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमासाठी महिलांसाठी भेटवस्तू मार्कस भाऊ पंडित (पुणे) यांनी उपलब्ध करून दिल्या. जेवण व्यवस्थेसाठी गुप्तदात्यांचे सहकार्य लाभले, तर मंडप व्यवस्था सेंट मेरी कॅथोलिक चर्च जिर्णोद्धार समितीने केली. शीतपेय व्यवस्था श्री. विलास रखमाजी पंडित यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेंट मेरी युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच सेंट मेरी महिला मंडळाने विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल मकासरे यांनी केले. यावेळी प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या योगदानाचा गौरव केला.

संवत्सर महानुभाव आश्रमाच्या विकास कामांना मान्यता
पोलीस कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्लाचौघांसह ११ अनोळखी इसमांवर गुन्हा
‘संत ज्ञानेश्वर’च्या विद्यार्थ्यांची शिर्डी विमानतळास भेट

देवळाली प्रवरा : जागतिक महिला दिनानिमित्त (दि. ८) सेंट मेरी कॅथोलिक चर्च, देवळाली प्रवरा येथे महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त रविवारी नियोजित मिसा पार पडली. त्यानंतर सेंट मेरी युवक मंडळाच्या वतीने आयोजित ‘सन्मान नारी शक्तीचा’ हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फादर प्रकाश राऊत, सिस्टर अर्चना, सिस्टर हिल्डा, नगरसेविका सुवर्णा कोठुळे व नगरसेविका सिंधु वाळुंज उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंजना रावजी पंडित यांनी स्थान भूषविले.

यावेळी उपस्थित सर्व महिलांचा पुष्पगुच्छ व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. महिला सन्मान कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमासाठी महिलांसाठी भेटवस्तू मार्कस भाऊ पंडित (पुणे) यांनी उपलब्ध करून दिल्या. जेवण व्यवस्थेसाठी गुप्तदात्यांचे सहकार्य लाभले, तर मंडप व्यवस्था सेंट मेरी कॅथोलिक चर्च जिर्णोद्धार समितीने केली. शीतपेय व्यवस्था श्री. विलास रखमाजी पंडित यांनी केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सेंट मेरी युवक मंडळाच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. तसेच सेंट मेरी महिला मंडळाने विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल मकासरे यांनी केले. यावेळी प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा देत महिलांच्या योगदानाचा गौरव केला.

COMMENTS