Homeताज्या बातम्यामनोरंजन

झपाटलेला’ सिनेमाची 30 वर्षे पूर्ण

बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे रामदास पाध्ये यांनी तात्या विंचूला जिवंत केलं होतं. आता त्यांचे सुपुत्र सत्यजित पाध्ये यांनी आपल्या वडिलांचा हा बो

राणेंचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला
 संदिप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा छडा लागेल – आशिष शेलार 
नागपुरात आढळला ओमिक्रोनचा पहिला रुग्ण

बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारे रामदास पाध्ये यांनी तात्या विंचूला जिवंत केलं होतं. आता त्यांचे सुपुत्र सत्यजित पाध्ये यांनी आपल्या वडिलांचा हा बोलक्या बाहुल्यांचा वारसा पुढे नेत जगभरात पोहोचवला आहे. आज तात्या विंचूच्या ३० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक पोस्ट करत ‘झपाटलेला’ चे कधीही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. त्यांनी पोस्ट करत लिहिलं, ‘३० वर्ष. हो, झपाटलेला ह्या सिनेमाला आज ३० वर्ष पूर्ण होत आहेत. १६ एप्रिल १९९३ ह्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तुम्ही सर्वांनी त्याला आयकॉनिक बनवला. तात्या विंचू हे पात्र सुद्धा भारतीय व मराठी सिनेमाच्या इतिहासातलं एक अविभाज्य घटक बनलं. आज २०२३ साल आहे आणि आमच्या तात्या विंचूची लोकप्रियता दरवर्षी वाढतच आहे.’ त्यांनी पुढे लिहिलं, ‘सोशल मीडियाच्या युगात आज त्याच्यावर अनेक मीम बनत आहेत. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे, जी मुलं १९९३ ला जन्माला सुद्धा आली नव्हती, त्यांना सुद्धा आमचा तात्या विंचू आवडतो. या निमित्ताने, आम्ही (झपाटलेला आणि झपाटलेला २ ची संपूर्ण टीम) आमच्या लाखो चाहत्यांचे आभार मानू इच्छितो ज्यांनी हे घडवून आणले. आमच्या तात्या विंचूवर असेच प्रेम करत रहा. ह्या निमित्याने, झपाटलेला ह्या सिनेमाची काही पडद्यामागची छायाचित्रे आम्ही शेअर करत आहोत.’ त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत

COMMENTS