नांदेड : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मौजे हिंगणी येथे घराला लागून असलेल्या गोठ्यात हातभट्टी दारू काढण्याचा प्रयत्

नांदेड : माहूर तालुक्यातील अतिदुर्गम व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या मौजे हिंगणी येथे घराला लागून असलेल्या गोठ्यात हातभट्टी दारू काढण्याचा प्रयत्न करणार्या एका व्यक्तीवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. या कारवाईत दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे हजारो रुपयांचे साहित्य नष्ट करण्यात आले. ही घटना रविवारी (दि. 8) सकाळी सुमारे 10 वाजता घडली.
पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या ऑपरेशन फ्लॅश आऊट तसेच पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्या अवैध दारूविक्रीविरोधातील मोहिमेअंतर्गत माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार हिंगणी येथे एका व्यक्तीने गोठ्यात हातभट्टी दारू तयार करण्याची तयारी सुरू केल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ धाड टाकली. या धाडीत मोहफुलांपासून तयार केलेले रसायन व इतर घातक केमिकल्स जप्त करून नष्ट करण्यात आले. तसेच दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्यही नष्ट करण्यात आले असून संबंधित व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस हवालदार प्रशांत भोपळे, पोलीस कर्मचारी पवन राऊत, होमगार्ड उमेश भगत व खुशवंत वर्मा यांनी केली. दरम्यान, अवैध दारूविक्री व हातभट्टी दारू काढणार्या व्यक्तींना गावकर्यांनी समुपदेशन करावे. त्यानंतरही प्रकार सुरू राहिल्यास तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी यावेळी गावकर्यांना केले.

COMMENTS