Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जय पवार मांडणार अजितदादांच्या अपघातावर भूमिका

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर पवार कुटुंबीयांकडून प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली जाणार आहे. अजित पवा

अशोक चव्हाण-अजित पवारांमध्ये ’गुफ्तगू’
सहकार क्षेत्रात अजितदादांचा स्वाहाकार !
राष्ट्रीय पुरस्कारांमुळे राज्याच्या गौरवशाली परंपरेचा मराठमोळा ठसा अधिक ठळक झाला – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे गौरवोद्गार

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेतील निधनानंतर पवार कुटुंबीयांकडून प्रथमच सार्वजनिक भूमिका मांडली जाणार आहे. अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार आज सोमवारी (9 मार्च) पत्रकार परिषद घेणार होते, त्यासंदर्भात त्यांनी माहिती दिली होती, मात्र त्यानंतर ही पत्रकार परिषद लांबणीवर पडली आहे.
यापूर्वी जय पवार यांनी सामाजिक माध्यमांद्वारे तपास प्रक्रियेबाबत नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता ते प्रत्यक्ष माध्यमांसमोर येत असल्याने या प्रकरणातील अनेक मुद्द्यांवर ते भाष्य करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र ही पत्रकार परिषद लांबणीवर पडल्याने ते कधी पत्रकार परिषद घेतात आणि  विशेषतः विमान दुर्घटनेमागील कारणांबाबत ते कोणती भूमिका मांडतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. जय पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या प्रतिक्रियेत दुर्घटनेच्या तपासावर प्रश्‍न उपस्थित केले होते. विमानातील महत्त्वाचा नोंदवही यंत्र इतक्या सहजपणे नष्ट होणे शक्य नसल्याचा दावा त्यांनी केला होता. या प्रकरणातील संपूर्ण आणि निर्विवाद सत्य बाहेर आले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी व्यक्त केली होती. संबंधित विमान कंपनीची सर्व विमाने तातडीने सेवेतून हटवावीत तसेच या प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या प्रकरणावर संयत प्रतिक्रिया दिली आहे. विविध यंत्रणांकडून दुर्घटनेची चौकशी सुरू असून सध्या समोर आलेला अहवाल हा प्राथमिक स्वरूपाचा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व तपास अहवाल पूर्णपणे हाती आल्यानंतरच सविस्तर प्रतिक्रिया देणे योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.

COMMENTS