नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या दूरसंचार क्षेत्रातील कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या काही संचालकांविरुद्ध मोठ्या आर्थिक गैरव्यव

नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांच्या दूरसंचार क्षेत्रातील कंपनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या काही संचालकांविरुद्ध मोठ्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून सीबीआयने फसवणुकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.
2013 ते 2017 या कालावधीत बँकांकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्यवहारांमुळे एकूण सुमारे 1 हजार 85 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, कंपनीने घेतलेल्या कर्जातील निधीचा वापर ठरलेल्या उद्देशांऐवजी इतरत्र वळविण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 621 कोटी रुपयांचा तोटा झाल्याचे सांगितले जाते, तर युनायटेड बँक ऑफ इंडिया (नंतर पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण) ला जवळपास 463 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी फसवणूक आणि गुन्हेगारी कटाशी संबंधित कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही याच कंपनीविरुद्ध दुसर्या बँकेशी संबंधित मोठ्या कर्ज प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणातही हजारो कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराचा आरोप तपास यंत्रणांनी केला आहे.

COMMENTS