Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवजात गोऱ्ह्यांना गोणीत बांधून टाकून दिले

वांबोरीत संतापजनक प्रकार ; गोवंश कायद्यामुळे शेतकरी अडचणीत? देवळाली प्रवरा : वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याजवळ अत्यंत संतापजनक व हृदयद्रा

आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृतसंघाकडून रामनवमी महोत्सवाचे आयोजन
वाळकी गटात कोट्यवधींची विकासकामे मार्गी लावण्यात यशस्वी : बाळासाहेब हराळ
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये अहमदनगर राज्यात तिसरा

वांबोरीत संतापजनक प्रकार ; गोवंश कायद्यामुळे शेतकरी अडचणीत?

देवळाली प्रवरा : वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याजवळ अत्यंत संतापजनक व हृदयद्रावक प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात शेतकऱ्याने नवजात गोऱ्ह्यांच्या तोंडाला चिकट टेप लावून त्यांना गोणीत बांधून रस्त्याकडेला टाकल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काही नागरिकांना संशयास्पद गोणी आढळून आल्यानंतर हा प्रकार उघड झाला. गोणीत जिवंत अवस्थेत नवजात गोऱ्हे आढळून आल्याने उपस्थित नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. या मुक्या जनावरांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आल्याचे चित्र दिसून आले.

दरम्यान, गोवंश संरक्षण कायद्याचा अप्रत्यक्ष फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. अनेक शेतकरी नर जातीच्या गोऱ्ह्यांचे पालनपोषण करणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांना सोडून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

वाहतूक करणाऱ्यांना काही स्वयंघोषित कार्यकर्ते पकडून पोलिसांच्या स्वाधीन करत असल्याने गोऱ्ह्यांची वाहतूकही कठीण झाली आहे. परिणामी, काही ठिकाणी गोऱ्हे माळरानावर किंवा निर्जन भागात सोडून देण्याचे प्रकार वाढत असल्याचे दिसून येत आहे.आता प्रश्न उपस्थित होत आहे की, माळरानावर गोऱ्हे सोडणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रशासन कारवाई करणार का? तसेच या समस्येवर शासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS