देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वडनेर गावात खळबळजनक घटना समोर आली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४३ वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यातील वडनेर गावात खळबळजनक घटना समोर आली आहे. चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ४३ वर्षीय इसमाचा मृतदेह विहिरीत आढळून आला असून नातेवाईकांनी थेट हत्येचा आरोप केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
राहुरी तालुक्यातील वडनेर येथील संदिप भिमाजी गेठे, वय ४३ वर्षे, हे २८ फेब्रुवारी रोजी पहाटे घरातून बेपत्ता झाले होते. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती.
चार दिवसांपासून सुरू असलेल्या शोधानंतर आज दि. २ मार्च रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घराजवळील अशोक बलमे यांच्या विहिरीत त्यांचा नग्न अवस्थेतील मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला आणि परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व हवालदार रामनाथ सानप घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. मृतदेह राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून नंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

COMMENTS