Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्रीक्षेत्र मोहटादेवीगडावर होळीचा सण उत्साहात

पाथर्डी : श्री क्षेत्र मोहटादेवीगडावर होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला .हुताशनी पौर्णिमा निमीत्त देवीच्या मंदिरात वि

शिर्डीत साई मंदीरावर परंपरेनुसार उभारली गुढी
शेतकर्‍यांवर संकटांचा डोंगर
ये मोदी,मोदी क्या ये तो कुछ भी नही है ..

पाथर्डी : श्री क्षेत्र मोहटादेवीगडावर होळीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला .हुताशनी पौर्णिमा निमीत्त देवीच्या मंदिरात विविध रंगाच्या फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी अभिषेक पूजा, महाआरती करण्यात आली. दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दुपारी आरतीनंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात आला.

यावेळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, जनसंपर्क अधिकारी भिमराव खाडे, लेखापाल संदीप घुले,  तसेच कर्मचारी, ग्रामस्थ व भाविक उपस्थित होते.

 फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा होणाऱ्या या सणाचे धार्मिक, वैज्ञानिक आणि सामाजिक महत्व आहे. आपल्या मनातील वाईट विचार, अशुद्ध प्रवृत्ती आणि अमंगल गोष्टींचे होळीच्या अग्नीत दहन करून मन निर्मळ करणे, हा यामागील मुख्य उ‌द्देश असतो. देवस्थानचे विश्वस्त बाळासाहेब लाहोटी यांच्या हस्ते शास्त्रोक्त पध्दतीने होलीका दहन करण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून होळीचे दर्शन घेतले. कार्यक्रमाचे पौराहित्य वे. भूषण साकरे, वे. भास्कर देशपांडे व विकास क्षीरसागर यांनी केले. आज मंदिर गाभारा आकर्षक फुलांची सजावट अहिल्यानगर येथील भाविक राजू बलभीम सानप यांच्या वतीने करण्यात आली. 

COMMENTS