Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवटमध्ये शिवसेनेचे युवानेते करण यंड्रलवार यांचा वाढदिवस जल्लोषात; जनसेवेच्या उपक्रमांनी वेधले लक्ष

किनवट । प्रतिनीधीशिवसेनेचे धडाडीचे युवानेते करण यंड्रलवार यांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी 2026 रोजी किनवट शहरात मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्

कंत्राटी विद्युत कामगारांच्या हक्कासाठी मनसे आक्रमक; 2 फेब्रुवारीला नांदेडमध्ये ’ढोल बजाओ’ आंदोलन
घेणार्‍यांवर कठोर कारवाई करा; किनवटमध्ये संघटना आक्रमक
किनवट वनविभागाचा संशयास्पद ’स्टंट’; माल जप्त, पण तस्कर पसार!

किनवट । प्रतिनीधी
शिवसेनेचे धडाडीचे युवानेते करण यंड्रलवार यांचा वाढदिवस 27 फेब्रुवारी 2026 रोजी किनवट शहरात मोठ्या उत्साहात आणि विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिर आणि अन्नदान कार्यक्रमाला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. वाढदिवसाच्या निमित्ताने जमा झालेली चाहत्यांची गर्दी पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे एक मोठे ’शक्ती प्रदर्शन’ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.
वाढदिवसाची सुरुवात यंड्रलवार यांनी श्री अय्यप्पा स्वामी मंदिरात सहकुटुंब पूजा करून केली. त्यानंतर त्यांनी संत गाडगेबाबा जयंती सोहळ्यात सहभाग नोंदवला तर नगरपरिषद कार्यालयासमोर आयोजित रक्तदान शिबिराचे त्यांचे मातोश्री तथा नगराध्यक्षा  सुजाता विनोद यंड्रलवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. नांदेड येथील नंदिग्राम आणि गुरुगोविंदसिंगजी रक्त संकलन केंद्र यांनी रक्त संकलनाचे काम पाहिले. संथागार वृद्धाश्रम बस स्थानक परिसर (अन्नदान) आणि पवित्र रमजान महिना असल्याने खैरोद्दिन मार्ग येथे मुस्लिम बांधवांसाठी  इफ्तारपार्टीचे आयोजन केले. आदिवासी युवा नेता केशव कराळे यांच्या पुढाकाराने पारंपारिक आदिवासी दंडार नृत्य सादर करून यंड्रलवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले. मिळालेल्या शुभेच्छांनी भारावून जात करण यंड्रलवार भावूक स्वरात म्हणाले, ’आज प्रत्येक जाती-धर्मातील बांधवांनी दिलेले हे प्रेम आणि आशीर्वाद माझ्यासाठी केवळ सदिच्छा नसून माझ्या आगामी प्रवासातील ऊर्जास्रोत आहेत. मी तुम्हा सर्वांच्या ऋणी आहे. जनसेवेचा हा वारसा असाच अविरत सुरू राहील; सामान्य जनतेच्या प्रगतीसाठी आणि उत्थानासाठी मी यापुढेही निस्वार्थपणे कटिबद्ध असेन.’ या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यात प्रामुख्याने: कैलास गोरटेकर (राष्ट्रवादी काँग्रेस), दयाळ गिरी (विधानसभा संपर्कप्रमुख, शिवसेना), ज्योतिबा खराटे (जिल्हाप्रमुख), मारोती दिवसे (तालुका प्रमुख),ड यश खराटे (युवासेना जिल्हाप्रमुख), मुख्याधिकारी मुगाजी काकडे व कार्यालयीन अधीक्षक अशोक भालेराव (नगरपरिषद प्रशासन) यांच्यासह पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते, शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत कोरडे, संतोष यलचलवार, राकेश गण्णोजवार, शिवा तिरमनवार, साई नेमानीवार यांच्यासह शिवसेना व युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

COMMENTS