Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्हीएसआर कंपनीचा मालक वैमानिकांच्या सीटवर झोपला

जय पवारांनी व्हिडिओ शेअर करत केली कारवाईची मागणीपुणे ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या चौकशीवरून आता नवा व

विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी विधानभवन परिसरात माध्यमांशी साधला संवाद
महाराष्ट्राचा आपला ‘दादा’ हरपला : घोगरे
राष्ट्रवादी विलीनीकरणाचा कलगीतुरा !

जय पवारांनी व्हिडिओ शेअर करत केली कारवाईची मागणी
पुणे ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर सुरू असलेल्या चौकशीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांचे पुत्र जय अजित पवार यांनी सामाजिक माध्यमावर व्यक्त केलेल्या भूमिकेमुळे प्रकरणाला भावनिक तसेच राजकीय वळण मिळाले आहे. जय पवार यांनी वडिलांच्या निधनाची वेदना व्यक्त करत चौकशी प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओत व्हीएसआर कंपनीचे मालक रोहित सिंह हे उड्डाणादरम्यान मुख्य वैमानिकाच्या आसनावर झोपले होते, असा गंभीर आरोप केला आहे. आकाशात प्रवाशांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी असताना अशा प्रकारची निष्काळजी वृत्ती अस्वीकार्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्‍वभूमीवर त्यांनी नागरी उड्डाण महासंचालनालयाकडे कठोर कारवाईची मागणी केली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित कंपनीची सर्व विमाने उड्डाणबंदी करावीत, तसेच जबाबदारांवर तातडीने गुन्हा नोंदवून कायदेशीर कारवाई करावी, अशी त्यांची मागणी आहे. ही केवळ एका मुलाची आर्त भावना नसून प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या दुर्घटनेबाबत हवाई उड्डाण मंत्रालयाच्या अपघात तपास यंत्रणेने सादर केलेला प्राथमिक अहवाल चर्चेत आहे. 28 जानेवारी रोजी झालेल्या या दुर्घटनेत अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला होता. अहवालात कमी दृश्यमानता, दृश्यमान उड्डाण नियमांचे संभाव्य उल्लंघन आणि नियंत्रण नसलेल्या विमानतळावरील सुरक्षेतील त्रुटी या मुद्द्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. मात्र, हा अहवाल अपुरा आणि वरवरचा असल्याची टीका जय पवार यांनी केली आहे. केवळ प्राथमिक निष्कर्ष मांडून जबाबदारी निश्‍चित न करता तपास पूर्ण झाल्याचे चित्र उभे करणे योग्य नाही, असे त्यांचे मत आहे. राज्यातील जनतेला आणि पीडित कुटुंबांना पारदर्शक, सखोल आणि निष्पक्ष चौकशीची अपेक्षा असल्याचे त्यांनी नमूद केले. या सर्व घडामोडींमुळे विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत नव्याने प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. भावनिक आवाहन, गंभीर आरोप आणि प्राथमिक अहवालातील निरीक्षणे यामुळे पुढील चौकशीची दिशा काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटींचा तपास करून जबाबदारी निश्‍चित केली जाणार का, तसेच संबंधित यंत्रणा कितपत पारदर्शकता दाखवणार, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

COMMENTS