Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाढदिवसाचे चॉकलेट ठरले आयुष्याचा टर्निंग पॉइंट !

 गरीब मजुराच्या १४ वर्षांच्या मुलीला पुन्हा मिळाली नवी दृष्टी देवळाली प्रवरा : चौदा वर्षांची, आठवीत शिकणारी संस्कृती अर्जुन नालकर… वाढदिवशी हातात 

गाईचे श्राद्ध ! देवळाली प्रवरात श्रद्धा, परंपरारेचा अनोखा संदेश
राहुरी कृषी विद्यापीठाकडून तेल्या रोगाबाबत मार्गदर्शन
सामंजश्यानी वाद मिटविल्यास समाजात शांतता राहते;न्या.वाडकर

 गरीब मजुराच्या १४ वर्षांच्या मुलीला पुन्हा मिळाली नवी दृष्टी

देवळाली प्रवरा : चौदा वर्षांची, आठवीत शिकणारी संस्कृती अर्जुन नालकर… वाढदिवशी हातात चॉकलेट… पण डोळ्यांतील उजेड हरवलेला… चिंचविहिरे येथील या मुलीच्या आयुष्यातील हा क्षण केवळ भावनिक नव्हता; तो तिच्या भविष्याचा टर्निंग पॉइंट ठरला.

उच्च मधुमेहामुळे संस्कृतीच्या दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला. फळ्यावरची अक्षरे धूसर दिसू लागली, पुस्तकातील ओळी हरवू लागल्या आणि कायमच्या अंधत्वाची भीती कुटुंबासमोर उभी राहिली. तीन डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी जवळपास दोन लाखांचा खर्च सांगितला. लाकडाच्या वखारीत मजुरी करणारे वडील अर्जुन नालकर आधीच कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले. निराशेचे सावट अधिकच गडद झाले होते.

दरम्यान, मकर संक्रांतीनंतर शाळा भेटीदरम्यान माजी खासदार प्रसाद तनपुरे शाळेत आले होते. वाढदिवसानिमित्त संस्कृतीने त्यांना एक चॉकलेट दिले. तिच्या डोळ्यांतील धूसरपणा त्यांच्या लक्षात आला. शिक्षिका कविता जेजुरकर यांनी तिची परिस्थिती सांगितली आणि त्याक्षणी तनपुरे यांनी संपूर्ण शस्त्रक्रियेचा खर्च उचलण्याचा निर्णय घेतला. तोच संस्कृतीच्या आयुष्यातील “उजेडाचा दिवस” ठरला.

राहुरी शहरातील यश नेत्रालय येथे नेत्रतज्ज्ञ डॉ. सुवर्णा गोलेचा यांनी अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडली. उच्च मधुमेहामुळे धोका अधिक असतानाही एआय तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक मल्टीफोकल लेन्स बसविण्यात आल्या. विशेष म्हणजे, मोठा खर्च असूनही डॉ. गोलेचा यांनी ही शस्त्रक्रिया विनामूल्य केली. “पहिला डोळा यशस्वी झाल्यावर तात्काळ दुसऱ्याची शस्त्रक्रिया केली. तिला कायमचा उजेड मिळवून देणे हाच उद्देश होता,” असे त्या म्हणाल्या.आज संस्कृतीला चष्म्याची गरज नाही. ती पुन्हा आत्मविश्वासाने शाळेत जाते, फळ्यावरची अक्षरे स्पष्ट वाचते आणि भविष्याकडे नव्या आशेने पाहते. वडील अर्जुन नालकर भावूक होत म्हणतात, “दोन लाखांचा खर्च आमच्या आवाक्याबाहेर होता. आम्ही पूर्णपणे हतबल झालो होतो. तनपुरे साहेबांमुळे घरात आनंद परतला..”

राहुरी येथील यश नेत्रालयात डॉ. सुवर्णा गोलेचा यांनी संस्कृतीच्या दोन्ही डोळ्यांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया केली. उच्च मधुमेहामुळे ही प्रक्रिया आव्हानात्मक होती. अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानावर आधारित मल्टीफोकल लेन्स बसवण्यात आल्या. विशेष म्हणजे लेन्स व औषधांचा खर्च घेऊन शस्त्रक्रिया विनामूल्य करण्यात आली.“दोन्ही डोळ्यांना मल्टीफोकल लेन्स बसवल्या. तिला चष्म्याची गरज भासणार नाही. मधुमेहामुळे शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती, पण यशस्वी झाली.”

– डॉ. सुवर्णा गोलेचा, नेत्रतज्ञ

“पहिल्यांदा त्यांनाच बघायचं आहे…”

डोळ्यावरील  पट्ट्या काढण्यापूर्वी संस्कृतीने एकच इच्छा व्यक्त केली –  “ज्यांच्यामुळे मला पुन्हा दृष्टी मिळाली, त्यांनाच पहिल्यांदा बघायचं आहे.”डॉक्टरांनी तिची इच्छा पूर्ण केली. एकेका डोळ्याची पट्टी काढली. किलकिले डोळे उघडताच समोर बसलेले प्रसाद तनपुरे दिसले आणि संस्कृतीचे डोळे आनंदाश्रूंनी भरले. आई-वडिलांचेही अश्रू अनावर झाले. तो क्षण उपस्थित प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला.

COMMENTS