Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात विद्यार्थी सहभाग परिसंवाद उत्साहात  

पाथर्डी : येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत विद्यार्थी सहभाग परिसंवादाचे आ

नवरात्रोत्सवात भाविकांना ई पास उपलब्ध करून देण्याचा अनोखा उपक्रम
पाथर्डीत मंगळसूत्र चोरीच्या घटनांत वाढ
पाथर्डीत हर्षवर्धन सपकाळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

पाथर्डी : येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत विद्यार्थी सहभाग परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. ‘माझा परिसर माझे गाव – विकासाचे मॉडे या विषयावर आयोजित या परिसंवादामध्ये शहरातील बाबूजी आव्हाड महाविद्यालय व श्री आनंद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. एकविसाव्या शतकात विकासाचे मॉडेल म्हणून स्वत:चे गाव कसे आदर्शवत करता येईल या विषयी परिसंवादात विद्यार्थांनी आपली मते मांडली.

पुणे जिल्ह्यातील आडाची वाडी, पोपटराव पवार यांचे हिवरे बाजार, आण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धी तसेच भास्कर पेरे पाटील यांचे पाटोदा गाव कशा पद्धतीने विकासाचे मॉडेल म्हणून देशभर नावाजले गेले.या गावांनी विकासाच्या कोणकोणत्या नवसंकल्पना राबविल्या याविषयी माहिती देण्यात आली.

या परिसंवाद कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बबन चौरे तर परीक्षक म्हणून चैतन्य उद्योगसमूहाचे अनंत ढोले व शिवकुश हायटेक नर्सरीचे शशिकांत बोरुडे तसेच व्यासपीठावर डॉ. जयश्री खेडकर, समन्वयक डॉ. अभिमन्यू ढोरमारे, प्रा. आनंद घोंगडे, डॉ. भगवान सांगळे उपस्थित होते.

यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अनंत ढोले म्हणाले, गावसुधारणेसाठी आवश्यक असणाऱ्या आयडिया व्यक्त करण्याचे हक्काचे व्यासपीठ म्हणजे हा परिसंवाद होय. गाव स्वयंपूर्ण होण्यासाठी माझा परिसर माझे गाव – विकासाचे मॉडेल ही थीम घेऊन करण्यात आलेली चर्चा ही कौतुकास पात्र आहे. पुणे विद्यापीठाने असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याची गरज आहे. परिसंवादात प्रथम क्रमांक बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या राणी जायभायच्या संघाने, द्वितीय क्रमांक बाबूजी आव्हाड महाविद्यालयाच्या ओमकार शिरसाट संघाने तर तृतीय क्रमांक श्री आनंद महाविद्यालयाच्या पल्लवी आंधळेच्या संघाने मिळविला. परिसंवाद कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. अभिमन्यू ढोरमारे, सूत्रसंचालन प्रा. शरद बोडखे तर आभार प्रा. आनंद घोंगडे यांनी मानले.

COMMENTS