Homeताज्या बातम्याअहमदनगर

कर्जतमधील २१ ग्रामपंचायतींचे तालुकास्तरीय मूल्यमापन

कर्जत : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध

चोंडी ते निमगाव डाकू रस्त्यासाठी 2 कोटी 7 लाख मंजूर  
संगमनेरकर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी; अन्न व औषध प्रशासनातून बदली न करण्याची मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
प्रसुती दरम्यान महिलेचा मृत्यू ; डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप | LOK News 24

कर्जत : तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकारातून राबविण्यात येत असलेल्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान” अंतर्गत तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींचे तालुकास्तरीय मूल्यमापन नुकतेच पार पडले. पंचायत समिती धारूरचे गटविकास अधिकारी लोखंडे व त्यांच्या पथकाने हे मूल्यमापन केले.राज्य शासनाच्या या अभिनव उपक्रमामध्ये ग्रामपंचायतींनी अभियान कालावधीत केलेल्या विविध विकासकामांचा सखोल आढावा घेण्यात आला. ग्रामविकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या करवसुली, घरकुल योजना पूर्णत्व, शाळा व अंगणवाडीतील भौतिक सुविधा, वृक्षलागवड, गावांमध्ये सीसीटीव्ही बसविणे, तसेच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या निकषांवर ग्रामपंचायतींचे मूल्यांकन करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायतींनी गावांच्या स्वच्छता, सुरक्षितता आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. गावपातळीवरील विकासकामांमध्ये लोकसहभाग वाढवून शाश्वत विकास साधण्याचा शासनाचा उद्देश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामुळे ग्रामपंचायतींमध्ये आरोग्यदायी स्पर्धा निर्माण होत असून गावांच्या विकासकामांना अधिक गती मिळत आहे. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून ग्रामीण भाग अधिक सक्षम व स्वयंपूर्ण करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.तालुकास्तरीय मूल्यमापन प्रक्रियेमुळे ग्रामपंचायतींना आपल्या कामकाजातील गुणवत्ता वाढविण्याची संधी मिळत असून आगामी काळात ग्रामीण विकासाच्या विविध उपक्रमांना अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

COMMENTS