श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे माजी विद्यार्थी संघटना नोंदणी प्रक्रियेच्या उद्देशाने आयोजित सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटन उभारणीस पाठिंबा दर्शविला. सभेच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे सांगितले. “शाळेने दिलेल्या संस्कारांची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ असून, संघटनेच्या माध्यमातून आपण विद्यालयाच्या प्रगतीत थेट योगदान देऊ शकतो,” असे ते म्हणाले. प्राचार्य वसंत नरवडे यांनी माजी विद्यार्थी संघटनेमागील संकल्पना स्पष्ट करताना विद्यालयाशी स्नेहबंध दृढ ठेवणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले. आर्थिक बळकटी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, वैचारिक समृद्धी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संघटना प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संतुलित विकास साधण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी मांडला. या सहविचार सभेस सरपंच सुजाता भोसले, उपसरपंच डॉ. दिलीप भोस, राजेंद्र उगले, बिभीषण उगले, सेवानिवृत्त प्राचार्य अविनाश गांगर्डे, अर्जुन उगले गुरुजी, पत्रकार उज्वलाताई उल्हारे, डॉ. सुधीर गुंजाळ, दिलीप जाधव, भगवान साळुंके, कृषी सहाय्यक मिलिंद भोसले, समीर शेख गुरुजी, आदिक उगले, महेश बोरुडे, प्रवीण लुणिया, आदिल शेख आदी मान्यवर माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत माजी विद्यार्थी संघटनेची अधिकृत स्थापना व नोंदणी करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला.

श्रीगोंदा : रयत शिक्षण संस्था अंतर्गत कार्यरत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोगरगाव येथे माजी विद्यार्थी संघटना नोंदणी प्रक्रियेच्या उद्देशाने आयोजित सहविचार सभा उत्साहात संपन्न झाली. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद देत संघटन उभारणीस पाठिंबा दर्शविला.
सभेच्या अध्यक्षस्थानी जनरल बॉडी सदस्य बाबासाहेब भोस उपस्थित होते. यावेळी त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येणे काळाची गरज असल्याचे सांगितले. “शाळेने दिलेल्या संस्कारांची परतफेड करण्याची हीच योग्य वेळ असून, संघटनेच्या माध्यमातून आपण विद्यालयाच्या प्रगतीत थेट योगदान देऊ शकतो,” असे ते म्हणाले.
प्राचार्य वसंत नरवडे यांनी माजी विद्यार्थी संघटनेमागील संकल्पना स्पष्ट करताना विद्यालयाशी स्नेहबंध दृढ ठेवणे हा उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे नमूद केले. आर्थिक बळकटी, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी, वैचारिक समृद्धी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संघटना प्रभावी व्यासपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संतुलित विकास साधण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक व विकासात्मक उपक्रम राबविण्याचा मानसही त्यांनी मांडला.
या सहविचार सभेस सरपंच सुजाता भोसले, उपसरपंच डॉ. दिलीप भोस, राजेंद्र उगले, बिभीषण उगले, सेवानिवृत्त प्राचार्य अविनाश गांगर्डे, अर्जुन उगले गुरुजी, पत्रकार उज्वलाताई उल्हारे, डॉ. सुधीर गुंजाळ, दिलीप जाधव, भगवान साळुंके, कृषी सहाय्यक मिलिंद भोसले, समीर शेख गुरुजी, आदिक उगले, महेश बोरुडे, प्रवीण लुणिया, आदिल शेख आदी मान्यवर माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत माजी विद्यार्थी संघटनेची अधिकृत स्थापना व नोंदणी करण्याचा ठोस निर्णय घेण्यात आला.

COMMENTS