Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव शहराच्या विकासाला नवी दिशा

रेणुका कोल्हे; सुख शांती नगर येथे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन  कोपरगाव : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून सुख शांती नगर येथील ओपन स्पेस संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान जिल्हास्तरीय योजनेतून प्रभाग क्रमांक २ मधील या कामासाठी सुमारे २२ लाख ८ हजार २५४ रुपये इतका अंदाजित निधी मंजूर करण्यात आला आहे.या  कामाचे भूमिपूजन सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.  यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर, गटनेते प्रसाद आढाव, बांधकाम सभापती निलोफर पठाण यांच्यासह संतोष शिंदे, दीपक जपे, कैलास मंजूळ, फिरोज पठाण, निसार शेख, राहुल खरात, वैभव गिरमे, मयूर गायकवाड, प्रतीक पगारे, गुर्मीत सिंग डडीयाल, रोशन शेजवळ, कैलास सोमासे, निलेश डोखे, सतीश खरात, सचिन त्रिभुवन, चेतन आगळे, अमर नरोडे, प्रशांत कोपरे, साहेबराव कोपरे, सुनील ढवळे, पल्लवीताई दडीयाल, स्वातीताई जपे, अनिताताई गाडे, दीपाताई गिरमे, रेणुका ताई नरोडे, दारूनकर ताई, अ‍ॅडव्होकेट झोडगे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  यावेळी बोलताना  रेणुकाताई कोल्हे यांनी सांगितले की, कोपरगाव शहराच्या प्रगतीची खरी गती अशा विकासकामांतूनच दिसते आहे. या ठिकाणी होत असलेल्या कामाचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या सहभागातून झाला असून, हे काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण व्हावे यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून कृतीयुक्त विकासाची घोडदौड वेगाने सुरू झाली आहे.काही दिवसांपासून शहरात स्वच्छता,पाणी यात सकारात्मक बदल दिसून येतो आहे. नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले जनतेला आम्ही दिलेली आश्वासने कृतीतून पूर्ण करण्यासाठी सर्वजण काम करतो आहोत.सर्वसामान्य नागरिक हे विविध क्षेत्रातील सकारात्मक बदल अनुभवत आहे त्यामुळे काम करतांना आमची प्रेरणादायी भावना आहे.

हरियाणा अजिंक्य ; महाराष्ट्राने पटकावले रजत पदक
संजीवनी इंजिनिअरिंगच्या पाच विद्यार्थ्यांना नोकरी
दीपक सोनवणे गोळाफेकमध्ये जिल्ह्यात प्रथम

रेणुका कोल्हे; सुख शांती नगर येथे संरक्षण भिंतीचे भूमिपूजन

 कोपरगाव : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले असून सुख शांती नगर येथील ओपन स्पेस संरक्षण भिंतीच्या बांधकामाचा शुभारंभ उत्साहात पार पडला. कोपरगाव नगरपरिषद अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथान जिल्हास्तरीय योजनेतून प्रभाग क्रमांक २ मधील या कामासाठी सुमारे २२ लाख ८ हजार २५४ रुपये इतका अंदाजित निधी मंजूर करण्यात आला आहे.या  कामाचे भूमिपूजन सौ. रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांच्या शुभहस्ते नगराध्यक्ष पराग संधान यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

 यावेळी उपनगराध्यक्ष जितेंद्र रणशुर, गटनेते प्रसाद आढाव, बांधकाम सभापती निलोफर पठाण यांच्यासह संतोष शिंदे, दीपक जपे, कैलास मंजूळ, फिरोज पठाण, निसार शेख, राहुल खरात, वैभव गिरमे, मयूर गायकवाड, प्रतीक पगारे, गुर्मीत सिंग डडीयाल, रोशन शेजवळ, कैलास सोमासे, निलेश डोखे, सतीश खरात, सचिन त्रिभुवन, चेतन आगळे, अमर नरोडे, प्रशांत कोपरे, साहेबराव कोपरे, सुनील ढवळे, पल्लवीताई दडीयाल, स्वातीताई जपे, अनिताताई गाडे, दीपाताई गिरमे, रेणुका ताई नरोडे, दारूनकर ताई, अ‍ॅडव्होकेट झोडगे यांच्यासह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी बोलताना  रेणुकाताई कोल्हे यांनी सांगितले की, कोपरगाव शहराच्या प्रगतीची खरी गती अशा विकासकामांतूनच दिसते आहे. या ठिकाणी होत असलेल्या कामाचा शुभारंभ सर्व नागरिकांच्या सहभागातून झाला असून, हे काम वेळेत आणि दर्जेदार पूर्ण व्हावे यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पराग संधान आणि नगरसेवक पदाधिकाऱ्यांकडून कृतीयुक्त विकासाची घोडदौड वेगाने सुरू झाली आहे.काही दिवसांपासून शहरात स्वच्छता,पाणी यात सकारात्मक बदल दिसून येतो आहे.

नगराध्यक्ष पराग संधान म्हणाले जनतेला आम्ही दिलेली आश्वासने कृतीतून पूर्ण करण्यासाठी सर्वजण काम करतो आहोत.सर्वसामान्य नागरिक हे विविध क्षेत्रातील सकारात्मक बदल अनुभवत आहे त्यामुळे काम करतांना आमची प्रेरणादायी भावना आहे.

COMMENTS