शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द

अहमदनगर/प्रतिनिधी :- किरण काळे युथ फाऊंडेशन अहमदनगर आयोजित छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धेसाठी अनिस चुडीवाला यांच्या तर्फे शकुर प

ब्राम्हणवाडा आरोग्य केंद्र अहमदनगर जिल्ह्यात प्रथम
तुकाई’ प्रकल्प प्रलंबित ठेवणार्‍यांवर कारवाई होणार !
महापालिकेत मे अखेरपर्यंत होणार भरती

अहमदनगर/प्रतिनिधी :- किरण काळे युथ फाऊंडेशन अहमदनगर आयोजित छत्रपती शिवराय राज्यस्तरीय निमंत्रित कुस्ती स्पर्धेसाठी अनिस चुडीवाला यांच्या तर्फे शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ ज्येष्ठ व्यापारी कासमभाई चुडीवाला यांच्या हस्ते गदा स्पर्धेचे स्वागताध्यक्ष तथा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सकाळपासूनच स्री व पुरुष मल्लांचे मोठ्या संख्येने आगमन सुरू झाले असून किरण काळे यांनी हार घालत मल्लांचे नगरच्या क्रीडानगरीत स्वागत केले आहे. काल रात्री उशिरा पोलीस उपअधीक्षक अनिल कातकडे, कोतवाली पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या पथकाने स्पर्धा स्थळाची काळे यांच्यासह पाहणी करत चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
वाडिया पार्क येथे होणाऱ्या कुस्ती स्पर्धांच्या प्रांगणात भव्य असे ३ मोठे प्रवेशद्वार उभारण्यात आले आहेत. माळीवाड्याच्या बाजूला असणाऱ्या प्रवेशद्वाराला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार तर एम. आर. ट्रेड सेंटर कडून असणाऱ्या प्रवेशद्वाराला राजश्री शाहू महाराज, सावित्रीमाई व महात्मा ज्योतिबा फुले प्रवेशद्वार तर वाडिया पार्क येथील मैदानाकडे जाणाऱ्या स्टेजजवळील प्रवेशद्वाराला भगवान महावीर प्रवेशद्वार असे नाव देण्यात आले आहे, अशी माहिती अहमदनगर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांनी दिली आहे. अहमदनगर शहरातील जुने नामवंत मल्ल शकुर पैलवान होते. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील त्यांनी अहमदनगर शहराचे नाव गाजवले होते. १९५७ च्या काळात त्यांच्या कार्याची दखल अनेक मोठ्या नामांकित वृत्तपत्राने घेतली होती. पटियाला येथे होणाऱ्या जकार्ता ऑलिम्पिक निवड चाचणी शिबिरासाठी त्यांनी निवड झाली होती. कुस्तीच्या आखाड्यात नाचून कुस्ती करणारे नामवंत मल्ल म्हणून त्यांची अहमदनगर जिल्ह्याबाहेर देखील एक वेगळी ओळख होती. त्यांच्या वजनापेक्षा कितीतरी जास्त वजनाच्या मल्लांना त्यांनी त्यांच्या डावांच्या जोरावर त्यांनी धूळ चारली होती. अनेक जागतिक कीर्तीच्या नामवंत मल्लांनी त्यांना अनेक डाव शिकवले होते. शकुर पैलवान यांचे सामाजिक क्षेत्रातही त्यांचे मोठे योगदान होते. अहमदनगर येथील बाजारपेठेत शांतता, सुव्यवस्था व जातीय सलोखा ठेव्यासाठी त्यांचे मोठे योगदान नेहमी असत. सर्व जाती – धर्माचे व्यापारी त्यांना नेहमी आदर आणि प्रेम करत असत. बाजारपेठेमध्ये चुडीवाला परिवारास मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या व्यापारी बांधवांनी यावेळी किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द केली. यावेळी शहर ब्लॉक अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी विरोधी पक्ष नेते दशरथ शिंदे, विद्यार्थी काँग्रेस प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा अध्यक्ष प्रवीण गीते, तालीम संघाचे पै.वैभव लांडगे, पै. नामदेव लंगोटे, अक्षय कुलट, ज्येष्ठ व्यापारी कासमभाई चुडीवाला, महंमद अली चुडीवाला, मुण्णा चाचा चुडीवाला, लियाकत अली चुडीवाला, हमजा अली चुडीवाला, बरकत अली, संजय चोपडा, किशोर गुगळे, धिरेंद्र बोरा, जुनेद शेख, श्रीपाद डोळसे, नरेश सुपेकर, अनुप असेरी, सरफराज चुडीवाला, राजू साकला, जुनेद रंगरेज, अहमद रंगरेज, प्रकाश बायड, इकबाल चुडीवाला, रशीद शेख, बाळू सोनग्रा, अशोक पटेल, बाल किसन सोनाग्रा, रफिक रंगरेज, वसीम सय्यद, इरफान मुघल, अश्फाक पटेल, मयूर गोयेल, सद्दाम शौकत अली, गब्बुजी असेरी यांच्यासह अनेक व्यापारी बांधव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS