जामखेड : शहरातून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग शहराच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट आहे. आम्ही शहराच्या विकासाला नागरि सुविधांना प्राधान्य देत आहे.

जामखेड : शहरातून जात असलेला राष्ट्रीय महामार्ग शहराच्या विकास योजनेमध्ये समाविष्ट आहे. आम्ही शहराच्या विकासाला नागरि सुविधांना प्राधान्य देत आहे. अतिक्रमणबाबत सर्वाना नियम समान आहे. भुयारी गटार योजनेचे काम दिर्घकाळासाठीचे आहे. त्या कामाच्या दर्जाबाबत तडजोड होणार नाही असे प्रतिपादन नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या,महामार्गाच्या कडेला नाली बांधली आहे. त्या नाली पलिकडे ३ मीटर म्हणजे १० फूट महामार्गाची हद्द आहे. त्या दहा फूटातुन शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे व भुयारी गटाराचे काम करायचे आहे. त्या ठिकाणी अतिक्रमण असल्याने पाणीपुरवठा योजना व भुयारी गटार योजनेचे काम रखडले आहे. त्यामुळे रस्त्याच्या मध्य भागापासून दोन्ही बाजूंचे १५ मीटरच्या आतील अतिक्रमण काढणे अवश्यक आहे त्यासाठी जामखेड नगरपरिषद प्रशासनाने संबधित नोटिसा बजावल्या. नोटीसा दिलेल्या सर्वांनी आपले अतिक्रमण काढुन घ्यावे स्वतःचे नुकसान टाळावे असे आवाहन चिंतामणी यांनी केले.
अतिक्रमणधारकांना नोटीसा
जामखेड शहरातून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम ठेकेदाराच्या व संबंधित प्रशासनाच्या बेफिकीरीमुळे चार वर्षापासून संथगतीने सुरू आहे. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांनी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक १० फेब्रुवारी बोलावली होती. जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्गालगत दोन्ही बाजूच्या स्टॉर्म वॉटर लाईन पासून ३ मीटरच्या आत येणारे सर्व बांधकाम अनधिकृत आहे. या अतिक्रमणधारकांना ७ दिवसांची मुदत द्यावी असा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुख्याधिकारी अजय साळवे यांनी नोटीस मिळाल्यापासून सात दिवसांत अतिक्रमणे काढून घ्यावे, अन्यथा संबंधित यंत्रणेमार्फत बांधकाम काढण्यात येईल, त्याचा खर्च आपणाकडून वसूल केला जाईल,अशी नोटीस ११ फेब्रुवारी रोजी दिली आहे.

COMMENTS