Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशासाठी विश्‍वचषक जिंकणे हेच अंतिम ध्येय ः रोहित शर्मा

दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज रोहित शर्माने 2027 मधील एकदिवसीय विश्‍वचषकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना देशासाठी ही स्पर्धा जिंकण्याच

आशिया चषकापूर्वी रोहितचं तिरूपती बालाजीला साकडं
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मावर वाहतूक पोलिसांची कारवाई
रोहित शर्माला भासतेय बुमराहची कमी ? 

दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा वरिष्ठ फलंदाज रोहित शर्माने 2027 मधील एकदिवसीय विश्‍वचषकाबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना देशासाठी ही स्पर्धा जिंकण्याची तीव्र इच्छा व्यक्त केली आहे. ट्वेंटी-20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित सध्या केवळ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे तो 2027 पर्यंत खेळत राहणार का, याबाबत चर्चा रंगू लागल्या होत्या.
एका कार्यक्रमात बोलताना रोहित म्हणाला, मला माझ्या देशासाठी विश्‍वचषक जिंकायचा आहे. लहानपणापासून मी 50 षटकांच्या विश्‍वचषक स्पर्धा पाहत क्रिकेट शिकलो. त्या काळात ट्वेंटी-20 विश्‍वचषक किंवा इंडियन प्रीमियर लीग नव्हती. एकदिवसीय विश्‍वचषक हीच सर्वात मोठी स्पर्धा मानली जायची. त्या ट्रॉफीला वेगळे महत्त्व होते. ती जिंकणे हेच माझे स्वप्न आहे आणि त्यासाठी मी पूर्ण क्षमतेने प्रयत्न करेन. रोहितच्या या वक्तव्यावरून 2027 च्या विश्‍वचषकासाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याची आणि सर्वोत्तम कामगिरी करण्याची त्याची बांधिलकी स्पष्ट होते. सध्या 38 वर्षांचा असलेला रोहित 2024 मध्ये भारताच्या यशस्वी ट्वेंटी-20 विश्‍वचषक मोहिमेनंतर त्या प्रकारातून निवृत्त झाला. त्यानंतर त्याने कसोटी क्रिकेटलाही अलविदा केला.
दरम्यान, अलीकडे जाहीर झालेल्या वार्षिक केंद्रीय करार यादीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना ‘गट ब’मध्ये स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी दोघेही सर्वोच्च ‘ए प्लस’ श्रेणीत होते. नव्या करार चक्रात एकूण 30 पुरुष आणि 21 महिला क्रिकेटपटूंना केंद्रीय करार देण्यात आले असून, खेळाडूंची वर्गवारी त्यांच्या कामगिरी आणि मागील हंगामातील सामन्यांच्या संख्येच्या आधारे करण्यात आली आहे. दोन प्रकारांतील कर्णधार शुभमन गिल, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि अनुभवी अष्टपैलू रवींद्र जडेजा यांना ‘गट अ’मध्ये स्थान देण्यात आले आहे. मात्र विविध श्रेणींसाठीची मानधन रक्कम जाहीर करण्यात आलेली नाही. रोहित शर्माचा संदेश स्पष्ट आहे-कारकिर्दीच्या उत्तरार्धात असतानाही त्याचे लक्ष 2027 च्या एकदिवसीय विश्‍वचषकावर केंद्रीत आहे. देशासाठी ही प्रतिष्ठेची ट्रॉफी जिंकणे, हेच त्याच्या क्रिकेट प्रवासातील सर्वात मोठे उद्दिष्ट ठरले आहे.

COMMENTS