Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेनेमुळे अनेक नागरिकांना दिलासा : डॉ. तोरडमल

कर्जत : तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय झाला असून, यापुढे बिगरशेती खुल्या प्लॉटच्या खरेदीसाठी नगरपंचायतकडील ना हरकत दाखला आवश्यक राहणा

वृक्षाप्रमाणे दात्याचा धर्म मनुष्याने अवलंबावा : प्रा.नगरकर
दादा पाटील’च्या शाहिदची अधिकारी पदाला गवसणी 
तुकाराम पवार यांची अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध समितीवर निवड

कर्जत : तालुक्यातील नागरिकांसाठी मोठा दिलासादायक निर्णय झाला असून, यापुढे बिगरशेती खुल्या प्लॉटच्या खरेदीसाठी नगरपंचायतकडील ना हरकत दाखला आवश्यक राहणार नाही. शिवसेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा व पाठबळामुळे हा महत्त्वाचा निर्णय प्रत्यक्षात आला असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख डॉ. नितीन ईश्वर तोरडमल यांनी दिली.यासंदर्भात त्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून यामध्ये  तोरडमल यांनी पुढे म्हटले आहे की,

अनेक वर्षांपासून नागरिकांना खुला प्लॉट खरेदी करताना नगरपंचायत कार्यालयातून ना हरकत दाखला मिळवण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. काही ठिकाणी अनावश्यक विलंब, तर काही ठिकाणी मोठ्या रकमेची मागणी होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हा प्रश्न गांभीर्याने घेत शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा केला.

तसेच यासंदर्भात दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी यांच्याशी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी आम्ही अधिकाऱ्यांकडे महाराष्ट्र शासनाचा अशा पद्धतीचा अध्यादेश अधिकृत असेल तर त्याची साक्षांकित प्रत आम्हास द्यावी अशी मागणी केली होती. यावर त्यांनी यासंदर्भात निश्चित असा अध्यादेश नाही मात्र या आपल्या दिलेल्या अर्जानुसार वरिष्ठानकडून आम्ही अभिप्राय मागून घेऊ व त्याप्रमाणे तात्काळ कार्यवाही करू असे सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेनुसार

आता कर्जत तालुक्यातील बिगरशेती खुल्या प्लॉटच्या खरेदीसाठी नगरपंचायत/नगरपालिका/महानगरपालिका यांचा उतारा बंधनकारक नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सामान्य, गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून प्लॉट व्यवहार अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहेत.  शासनाचा कोणताही अध्यादेश नसताना अशा पद्धतीने नगरपंचायत च्या साठी चुकीची कामे दुय्यम निबंध कार्यालय यांच्याकडून सुरूच राहिली तर मात्र शिवसेना स्टाईल आंदोलन करू व त्यावेळी सर्वस्वी जबाबदारी अधिकाऱ्यांवर राहील असा इशारा डॉ. नितीन तोरडमल यांनी दिला आहे.

COMMENTS