Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चंद्रपुरात काँगे्रसला धक्का देत भाजपचा महापौर

अवघ्या एका मताने भाजप-ठाकरे गटाच्या युतीतून महापौरपदी संगीता खांडेकरचंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूर महानगरप

भाजपकडून नव्या नेतृत्वाला संधी !
भाजपातील खदखद उफाळली !
हिमाचल प्रदेशात भाजपला बंडखोरीचे ग्रहण

अवघ्या एका मताने भाजप-ठाकरे गटाच्या युतीतून महापौरपदी संगीता खांडेकर
चंद्रपूर : गेल्या काही दिवसांपासून त्रिशंकू अवस्थेत अडकलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्तासंघर्षाचा अखेर नाट्यमय शेवट झाला. शेवटच्या टप्प्यावर राजकीय समीकरणे बदलत भाजपने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटाला सोबत घेत सत्ता स्थापन केली. या सत्तास्थापनेत भाजपच्या संगीता खांडेकर यांनी अवघ्या एका मताच्या फरकाने महापौरपद पटकावले असून, काँग्रेससाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
महापौर निवडीसाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा 34 होता. मात्र काही नगरसेवक गैरहजर राहिल्याने प्रत्यक्ष बहुमताचा आकडा 33 वर आला. या परिस्थितीत भाजप उमेदवार संगीता खांडेकर यांना 32 मते मिळाली, तर काँग्रेसच्या उमेदवाराला 31 मतांवर समाधान मानावे लागले. वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले, तर एमआयएमने तटस्थ भूमिका घेतल्यामुळे निकालावर निर्णायक परिणाम झाला. या सत्तास्थापनेत ठाकरे गटाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. भाजपकडून महापौरपदाची सूत्रे संगीता खांडेकर यांच्या हाती गेली असताना, उपमहापौरपद ठाकरे गटाच्या प्रशांत दानव यांच्याकडे जाणार आहे. दोन्ही पक्षांमध्ये सत्तावाटपाचा ठरलेला फॉर्म्युला निर्णायक ठरला. त्यानुसार महापौरपद आणि स्थायी समिती अध्यक्षपद सव्वा-सव्वा वर्षांच्या कालावधीसाठी परस्पर वाटून घेण्यावर एकमत झाले आहे. पहिल्या सव्वा वर्षांत स्थायी समिती अध्यक्षपद ठाकरे गटाकडे राहणार आहे. सुरुवातीला भाजपकडे 24 नगरसेवकांचे संख्याबळ होते. त्यात भाजपचे 23 आणि शिंदे गटाचा एक नगरसेवक होता. त्यानंतर ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्‍हे यांच्या नेतृत्वाखाली सहा नगरसेवक भाजपच्या गोटात दाखल झाले. तसेच दोन अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यामुळे भाजपचे संख्याबळ 32 पर्यंत पोहोचले. याउलट काँग्रेसकडे 31 नगरसेवकांवरच मर्यादा राहिली. विशेष म्हणजे, या सत्तानाट्याआधी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र येऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवतील, अशी जोरदार चर्चा होती. सकाळच्या सत्रात खासदार संजय राऊत यांनी भाजपविरोधात स्पष्ट भूमिका जाहीर केली होती. मात्र काही तासांतच राजकीय घडामोडी झपाट्याने बदलल्या आणि ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा जाहीर केल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली.

काँगे्रसमध्ये होते मतभेद
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिर्‍हे यांच्यात झालेल्या बैठकीत मतभेद तीव्र झाल्याची माहिती आहे. या बैठकीनंतर संदीप गिर्‍हे नाराज होऊन बाहेर पडले. त्यानंतर भाजप नेते किशोर जोरगेवार यांनी ठाकरे गटाच्या पाठिंब्याची अधिकृत घोषणा केली आणि सत्तास्थापनेला अंतिम रूप मिळाले. एकूणच अचूक संख्याबळ, रणनीती आणि वेळेवर केलेल्या राजकीय हालचालींच्या जोरावर भाजपने चंद्रपूर महानगरपालिकेवर सत्ता मिळवली आहे.

चंद्रपूर महापालिका : पक्षीय बलाबल
एकूण जागा : 66
काँग्रेस – 27
जनविकास सेना (काँग्रेस आघाडी) – 3
भाजप – 23
शिंदे गट – 1
ठाकरे गट – 6
वंचित बहुजन आघाडी – 2
बसपा – 1
अपक्ष – 2
एमआयएम – 1

COMMENTS