Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नॅशनल आझाद उर्दू शाळेत शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी

बीड । प्रतिनिधीमामल मोमिनपुरा, बीड - मामल मोमिनपुरा येथील नॅशनल आझाद उर्दू प्रायमरी अँड गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठ

बोगस ज्वारी बियाण्यांचा फटका; उंची दिड फुटावरच खुंटली, कडबा उत्पन्नही शून्य -तालुक्यातील शेतकरी हवालदिल!
सिरसाळ्यात महावितरणचा भोंगाळ कारभार! वसुली जोरात, लाईट कोमात; नागरिक आक्रमकदररोज 33 केव्हीचा बिघाड; हे गणित काय?वीज नसतानाही अव्वाच्या सव्वा बिल आणि वसुलीसाठी होणारा तगादा.विजेअभावी पिठाच्या गिरण्या, वेल्डिंग दुकाने आणि इतर लघुउद्योग संकटात.वारंवार वीज खंडित होत असल्याने विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम.
आरोग्य जनजागृतीद्वारे कॅन्सरवर नियंत्रण शक्य- डॉ.अक्षय कांबळे

बीड । प्रतिनिधी
मामल मोमिनपुरा, बीड – मामल मोमिनपुरा येथील नॅशनल आझाद उर्दू प्रायमरी अँड गर्ल्स हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आणि ते यशस्वीरीत्या पार पडले.
या उपक्रमांत शैक्षणिक सहल, वार्षिक क्रीडा स्पर्धा, 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रम, ग्रीन डे उपक्रम, इस्लामिक प्रदर्शन, बैतबाजी स्पर्धा आणि बक्षीस वितरण समारंभ यांचा समावेश होता. शैक्षणिक सहलीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निरीक्षणातून ज्ञान मिळाले व त्यांची बौद्धिक जिज्ञासा वाढीस लागली. वार्षिक क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त व संघभावना विकसित झाली. प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण, देशभक्तिपर गीते व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. ग्रीन डे निमित्त पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला. इस्लामिक प्रदर्शन व बैतबाजी स्पर्धांमधून विद्यार्थ्यांनी आपली कला, ज्ञान व सर्जनशीलता सादर केली. कार्यक्रमाच्या शेवटी गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांच्या सहकार्यामुळे सर्व उपक्रम सफलतेने पार पडले, असे शाळा व्यवस्थापनाने सांगितले.

COMMENTS