Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

त्र्यम्बकराज वारकरी संस्थेच्या विद्यार्थ्यांना रोटरी क्लब नाशिक यांकडून वह्या पुस्तके वाटप 

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी - त्र्यम्बकेश्वर येथील प्रसिद्ध मुलांची  त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना नुकतेच  नासिक रोटरी क्लब तर्

प्रचार साहित्यावर मुद्रक व प्रकाशकांचे नाव छापणे बंधनकारक ः कोळेकर
फ्रान्सने रोखलेले विमान आणि स्थलांतराचे वास्तव! 
आंब्यांची आवक वाढली व भावही घसरले

त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी – त्र्यम्बकेश्वर येथील प्रसिद्ध मुलांची  त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना नुकतेच  नासिक रोटरी क्लब तर्फे वह्या आणि पेन वाटप करण्यात आले. यांमुळे मुलांना शिक्षण घेत असतांना ऊर्जा तयार होत असते मुले अजून हिरहिरीने अभ्यास करतात. असे रोटरी क्लब चे अध्यक्ष निलेश चौधरी यांनी म्हटले . निलेश चौधरी , प्रसाद वाघचौरे यांनी देखील सदिच्छा भेट दिली असता या भेटी दरम्यान शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि कष्टकरी,  शेतकरी गोरगरीब  ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांच्या आध्यात्मिक, परमार्थिक ज्ञानाचा अभ्यास पाहून  मा. श्री. निलेश भाऊ  चौधरी आणि मा. श्री. प्रसाद भाऊ वाघचौरे यांनी यांनी संस्थेच्या विद्यार्थ्यांचे आणि  त्र्यंबकराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प. गोविंद महाराज शिरोळे  यांचे कौतुक केले.

आणि शिक्षणसंस्थेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी  200  वह्या  आणि  200 पेन  या शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले. यावेळी संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.गोविंद महाराज  यांनी रोटरी क्लब अध्यक्ष आदरणीय निलेशजी चौधरी आणि आदरणीय प्रसादजी वाघचौरे यांचा शाल श्रीफळ देऊन यथोचित सन्मान करून  सत्कार केला.  आणि विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, आध्यात्मिक, वाटचालीस भरभरुन शुभेच्छा दिल्या.  संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. गोविंद महाराज शिरोळे   हे विद्यार्थ्यांसाठी किती धडपड करतात याचे कौतुक करून संस्थेच्या सत्कार्यात आम्ही योगदान देऊ असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी संस्थेचे विद्यार्थी , कर्मचारी उपस्थित  होते।

COMMENTS