देशसेवा व समाज कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा – हरिभाऊ डोळसे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशसेवा व समाज कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा – हरिभाऊ डोळसे

नगर- प्रतिनिधी भारत हा सर्वाधिक युवक असलेला देश आहे युवा पिढीने समाजसेवेचे व देशसेवेचे कार्य करून भारत देशाला बळकटी देण्याचे कार्य करावे.तसेच पंतप

रूग्ण सेवकांची सोय झाल्यास अनेक ठिकाणी कोवीड सेंटर सुरू होतील- ऍड रविकाका बोरावके
भाजपच्या नव्या नगरसेवकाचा राष्ट्रवादीच्या आमदारांकडून सत्कार
समाज नेहमीच चांगल्या कार्याची दखल घेत असतो ः अ‍ॅड. मडके

नगर- प्रतिनिधी

भारत हा सर्वाधिक युवक असलेला देश आहे युवा पिढीने समाजसेवेचे व देशसेवेचे कार्य करून भारत देशाला बळकटी देण्याचे कार्य करावे.तसेच पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नपूर्ती चे कार्य युवाशक्तीने हाती घ्यावे.देशाच्या विकासात युवाशक्तीचे मोलाचे योगदान ठरेल या उद्देशाने नगर शहरातील तेली समाजातील युवक संघटित झाले आहे.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेने युवा संघटित करण्याचे कार्य हाती घेतले आहे. संताजी महाराजांच्या आदर्श शिकवणी प्रमाणे तेली समाजाची वाटचाल सुरू आहे.तेली समाज सुसंस्कृत व सुंदर व्हावा यासाठी युवकांनी संघटित व्हावे.युवाशक्तीच्या माध्यमातून युवकांचे प्रश्न व समाजाचे प्रश्‍न सोडविण्याचे कार्य महाराष्ट्र प्रांतिक महासभेच्या माध्यमातून केले जाईल.असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे यांनी केले.                       

टिळकरोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात महाराष्ट्र प्रांतिक तेली युवा आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.याप्रसंगी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे विभागीय कार्याध्यक्ष हरिभाऊ डोळसे मार्गदर्शन करताना बोलत होते.याप्रसंगी महानगर कार्याध्यक्ष कृष्णकांत साळुंके,सेवा आघाडीचे अध्यक्ष श्रीराम हजारे, सुरेशराव देवकर,विलासराव काळे,महानगर शहर उपाध्यक्ष सचिन म्हस्के,विश्वहिंदू परिषदेचे जिल्हामंत्री गजेंद्र सोनवणे,गोरक्षनाथ व्यवहारे,योग शिक्षक प्रमोद डोळसे आदी उपस्थित होते.                                                

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या बैठकीत तेली युवा आघाडीचे अध्यक्षपदी विक्रम शिंदे,उपाध्यक्षपदी प्रफुल्ल साळुंके,कार्याध्यक्षपदी गणेश धारक,सचिव शुभम जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.                                      

कृष्णकांत साळुंके म्हणाले की,युवा आघाडीच्या सर्व नूतन पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन करतो.युवाशक्तीची ताकद खूप मोठी आहे.युवकांचे प्रश्‍न सोडवण्यासाठी युवा आघाडीने कार्य करावे.

सुरेशराव देवकर म्हणाले की,नवीन पिढी समाजात परिवर्तन घडू शकते.युवकांनी संघटित होऊन समाज हितासाठी कार्य करावे.संघटनेचे सर्व जेष्ठ पदाधिकारी नेहमीच तुमच्या पाठीशी राहतील.असे सांगितले तसेच  शहर उपाध्यक्ष सचिन म्हस्के यांनीही मनोगत व्यक्त केले.                                                 

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सोनल काळे,श्रीकांत ढवळे,सागर शिंदे,शुभम भोत,अभिजीत म्हस्के,योगेश भागवत,महेश थोरात,सचिन देवकर,श्रीपाद डोळसे, योगेश शिंदे,गणेश दहितुले,गणेश डोळसे,दीपक शेलार,आनंद दारूणकर,गौरव क्षिरसागर,अमित डोळसे,विशाल क्षिरसागर,राहुल म्हस्के,गणेश म्हस्के, चेतन डोळसे,रुत्विक डोळसे,धनंजय जाधव,प्रथमेश काळे,अभिषेक रणखांब,गिरीश चोथे,प्रदीप मगर,प्रफुल्ल मगर आदी युवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन देवकर यांनी केले तर आभार गणेश धारक यांनी मानले.

COMMENTS