आंदोलनाचा इशारा श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील एस.आर. ढाबा ते जोधपूर वेशीपर्यंतचा रस्ता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नाशिक या एजन्सीमार्फत विकसित करण्यात येत आहे. मात्र हे काम गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णतः बंद असल्याने शहरवासीयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संभाजी ब्रिगेडकडून प्रतीकात्मक दशक्रिया विधी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. निवडणुका तोंडावर असताना शहरातील चांगले रस्ते घाईघाईने खोदण्यात आले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याने रस्त्यावर खडीचे ढिगारे पडून आहेत. या खडीत वाहने खचून अनेक अपघात झाले असून काही नागरिकांचे हात-पाय मोडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच एकपदरी वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, श्रीगोंदा शहरातील ग्रामदैवत शेख महमद बाबा यांचा यात्रोत्सव येत्या 27 तारखेला असून, महाराष्ट्रभरातून लाखो भाविक या यात्रेसाठी शहरात येतात. मात्र ऐन यात्रेच्या काळात रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने भाविक, नागरिक तसेच रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होणार आहे. या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्यात यावे व रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर, मुख्य रस्त्यावरील खडीवर बसून संबंधित एजन्सीविरोधात प्रतीकात्मक दशक्रिया विधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नाना शिंदे यांनी दिला आहे. यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश सूर्यवंशी, संदीप उमाप, कुणाल शिरवाळे, शिवसेना (शिंदे गट) युवक कार्यकर्ते दीपक मखरे, गोरख लोखंडे, उत्तम लोखंडे, नामदेव बोनगे आदी उपस्थित होते.

आंदोलनाचा इशारा
श्रीगोंदा : श्रीगोंदा शहरातील एस.आर. ढाबा ते जोधपूर वेशीपर्यंतचा रस्ता महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, नाशिक या एजन्सीमार्फत विकसित करण्यात येत आहे. मात्र हे काम गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णतः बंद असल्याने शहरवासीयांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर आठ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास संभाजी ब्रिगेडकडून प्रतीकात्मक दशक्रिया विधी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
निवडणुका तोंडावर असताना शहरातील चांगले रस्ते घाईघाईने खोदण्यात आले. त्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम अर्धवट अवस्थेत सोडून दिल्याने रस्त्यावर खडीचे ढिगारे पडून आहेत. या खडीत वाहने खचून अनेक अपघात झाले असून काही नागरिकांचे हात-पाय मोडल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच एकपदरी वाहतुकीमुळे धुळीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांना श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, श्रीगोंदा शहरातील ग्रामदैवत शेख महमद बाबा यांचा यात्रोत्सव येत्या 27 तारखेला असून, महाराष्ट्रभरातून लाखो भाविक या यात्रेसाठी शहरात येतात. मात्र ऐन यात्रेच्या काळात रस्ता खोदून ठेवण्यात आल्याने भाविक, नागरिक तसेच रस्त्याच्या दुतर्फा दुकाने थाटणाऱ्या व्यावसायिकांची मोठी गैरसोय होणार आहे.
या संदर्भात संभाजी ब्रिगेडच्या वतीने तहसीलदारांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. संबंधित ठेकेदाराला तातडीने काळ्या यादीत टाकण्यात यावे व रस्त्याचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सोमवारी 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर, मुख्य रस्त्यावरील खडीवर बसून संबंधित एजन्सीविरोधात प्रतीकात्मक दशक्रिया विधी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी नाना शिंदे यांनी दिला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे, सामाजिक कार्यकर्ते मंगेश सूर्यवंशी, संदीप उमाप, कुणाल शिरवाळे, शिवसेना (शिंदे गट) युवक कार्यकर्ते दीपक मखरे, गोरख लोखंडे, उत्तम लोखंडे, नामदेव बोनगे आदी उपस्थित होते.

COMMENTS