Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राजेंद्र घोडके यांचा भानगावमध्ये सत्कार

श्रीगोंदा : तालुक्यातील मांडवगण येथील पत्रकार राजेंद्र शंकरराव घोडके यांना सामाजिक क्षेत्रात व पत्रकारितेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दोन मान

शेतकऱ्याचा कांदा एक रुपया किलो !
कायदा हा सर्वांसाठी समान कायद्याचे उल्लंघन करणे हा गुन्हा ठरतो,- जिल्हा न्यायाधीश मुजीब एस शेख
श्रीगोंदा शहरातील रस्त्याचे काम पूर्ण करा – संभाजी ब्रिगेडची मागणी

श्रीगोंदा : तालुक्यातील मांडवगण येथील पत्रकार राजेंद्र शंकरराव घोडके यांना सामाजिक क्षेत्रात व पत्रकारितेत दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल दोन मानाचे पुरस्कार प्राप्त झाल्याने भानगाव येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.

घोडके यांना वर्ल्ड कॉन्स्टिट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन या जागतिक संस्थेकडून समाजसेवेसाठी दिला जाणारा ‘वर्ल्ड पार्लमेंट अवॉर्ड–2025’ हा आंतरराष्ट्रीय सन्मान तसेच स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, निमगाव वाघा यांच्याकडून प्रदान करण्यात येणारा ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार–2026’ हा राज्यस्तरीय बहुमान मिळाला आहे.

या गौरवाच्या निमित्ताने भानगाव येथील मित्रपरिवार, ग्रामस्थ, ग्रामपंचायत तसेच भानेश्वर विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉ. विक्रम भोसले, पंचायत समिती सदस्य व कुकडी कारखान्याचे संचालक, उपसरपंच मोहनदादा कुदांडे, माजी सरपंच आबासाहेब शितोळे, प्रमोद आप्पा जाधव, ह.भ.प. बाळासाहेब महाडिक, माजी मुख्याध्यापक सुभाषराव भापकर, मुख्याध्यापक विश्वनाथ शेलार यांच्यासह मानसींगराव टकले, नानाभाऊ आघाव, सुभाषराव शितोळे, वृक्षमित्र रामदासनाना साबळे, आप्पासाहेब शितोळे, मधुकर साबळे, मधुकर टकले, अशोकअण्णा शितोळे, भाऊसाहेब शितोळे, शरद इथापे, सूर्यभान साबळे, गुलाबराव तोरडमल, पप्पू तोरडमल आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS