Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये शेती व्यवहारातून दोन कोटींची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

नांदेड । प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात वडिलोपार्जित शेतजमिनीच्या व्यवहारात तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस

भूमापक माणिक वाघमारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
अर्धापूरात किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू
कर्जत शहरात माजी आमदार व नगराध्यक्षांच्या कुटुंबावर हल्ला

नांदेड । प्रतिनिधी

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात वडिलोपार्जित शेतजमिनीच्या व्यवहारात तब्बल दोन कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी सतीश मारोतीराव शिंदे (रा. हदगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरोधात इतवारा पोलीस ठाणे येथे मंगळवारी (दि. 19) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमनबाई नारायण साखरे यांनी त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमिनीवर वारसा हक्कासाठी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयातून हक्क मिळाल्यानंतर ही शेतजमीन सतीश शिंदे यांच्या नावावर विक्री करण्याचे ठरले. या व्यवहारासाठी सतीश शिंदे यांनी सुमनबाई साखरे यांच्यासह बालाजी हरी गोरे (रा. नांदेड), मारोती गुंडाळे (रा. नांदेड), नारायण राजाराम साखरे व राजेश नारायण साखरे (रा. पिंपरखेड, ता. हदगाव) यांना एकूण दोन कोटी रुपये दिल्याचा आरोप आहे. या रकमेच्या मोबदल्यात 100 व 500 रुपयांच्या बॉण्डवर लेखी हमी देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. मात्र, संबंधित आरोपींनी संगनमत करून न्यायालयातील दावा उचलून घेतला आणि शेतजमीन सतीश शिंदे यांच्या नावावर न करता त्यांची दोन कोटींची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेतील फसवणूक व विश्वासघातासंदर्भातील कलमांखाली गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. शेतजमीन व्यवहारात मोठ्या रकमेचा आर्थिक व्यवहार झाल्याने या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून, पुढील तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS