श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सुनीता संतोष खेतमाळीस या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून उपनगराध्यक्षपदी भाजपच्या अलका सुनील दरेकर यांची बहुमताने निवड झाली. खेतमाळीस यांनी नगरपरिषदेतील विविध विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानुसार महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या मिरा नितिन शिंदे यांची निवड करण्यात आली. बांधकाम समितीच्या सभापतीपदी कोमल विकास बोरुडे, आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रशांत मिठू गोरे, तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी शहाजी तुकाराम खेतमाळीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षण, कला व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सुशिलकुमार शिंदे यांची निवड झाली असून महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या दीपाली नंदकुमार बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व नियुक्त्यांमुळे नगरपरिषदेच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा श्रीमती सुनिता संतोष खेतमाळीस यांनी व्यक्त केला आहे.

श्रीगोंदा : श्रीगोंदा नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या सुनीता संतोष खेतमाळीस या नगराध्यक्षपदी निवडून आल्या असून उपनगराध्यक्षपदी भाजपच्या अलका सुनील दरेकर यांची बहुमताने निवड झाली. खेतमाळीस यांनी नगरपरिषदेतील विविध विशेष समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. त्यानुसार महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या मिरा नितिन शिंदे यांची निवड करण्यात आली.
बांधकाम समितीच्या सभापतीपदी कोमल विकास बोरुडे, आरोग्य समितीच्या सभापतीपदी प्रशांत मिठू गोरे, तर पाणीपुरवठा समितीच्या सभापतीपदी शहाजी तुकाराम खेतमाळीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण, कला व सांस्कृतिक समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे सुशिलकुमार शिंदे यांची निवड झाली असून महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या दीपाली नंदकुमार बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सर्व नियुक्त्यांमुळे नगरपरिषदेच्या विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास नगराध्यक्षा श्रीमती सुनिता संतोष खेतमाळीस यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS