Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पराभवाने खचायचे नाही, काम सुरूच ठेवायचे : अजित पवार

मनपा निवडणुकीतील अंदाज चुकल्याची कबुली; कार्यकर्त्यांना संयमाचा सल्लापुणे : महापालिका निवडणुकांतील निकालानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्

शिरूरच्या खासदारांची धरसोड भूमिका
आशुतोष पठ्ठ्या कामाला माझ्यासारखाच
अर्थखाते टिकेल की नाही सांगता येत नाही

मनपा निवडणुकीतील अंदाज चुकल्याची कबुली; कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला
पुणे : महापालिका निवडणुकांतील निकालानंतर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना धीर देत, पराभवाने खचून न जाता सातत्याने काम करत राहण्याचा सल्ला दिला. तसेच या निवडणुकांत भाजपला मिळालेल्या यशाबद्दल त्यांनी खुलेपणाने अभिनंदनही केले.
अजित पवार म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने निवडणुका लढवल्या आणि त्यांना मोठे यश मिळाले. लोकशाहीत विजय-पराभव हे स्वीकारावेच लागतात. पराभवामुळे निराश न होता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणे, हीच खरी राजकीय भूमिका असते. महापालिका निवडणुकांत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही. राज्यातील 29 महापालिकांमध्ये पक्षाला केवळ 167 जागांवर समाधान मानावे लागले. पुणे महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी गटांची युती असूनही केवळ 30 जागा मिळाल्या, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 37 जागांपर्यंतच मजल मारता आली. या पार्श्‍वभूमीवर अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. अजित पवार म्हणाले, लोकशाहीत मतदार हा सर्वोच्च असतो. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रयत्न करतो. मात्र यावेळी भाजपला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. मीडिया जसा सकारात्मक अंदाज व्यक्त करत होता, तसाच आमचाही होता. मात्र दोघांचेही अंदाज चुकले, हे मान्य करावेच लागेल, अशी कबुली अजित पवारांनी दिली.

COMMENTS