Homeताज्या बातम्यादेश

भाजपला 20 जानेवारीला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष

नवी दिल्ली । भारतीय जनता पक्षाला 20 जानेवारी रोजी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. यासंदर्भात पक्षाने अधिकृत अधिसूचना जारी करत अध्यक्षपदाच्या निव

मुंबईत महायुतीचा विजय अटळ ः मुख्यमंत्री फडणवीस
भाजपचा आमदार फुटला… ‘या’ पक्षात केला प्रवेश
नवी मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिवसैनिकाला चोपले

नवी दिल्ली । भारतीय जनता पक्षाला 20 जानेवारी रोजी नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे. यासंदर्भात पक्षाने अधिकृत अधिसूचना जारी करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार 19 जानेवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल होतील, तर 20 जानेवारीला नव्या अध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल.
सध्या नितीन नबीन हे भाजपचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. पक्षांतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांचीच बिनविरोध निवड होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपने 14 डिसेंबर रोजी नितीन नबीन यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. याआधी 2020 मध्ये जे. पी. नड्डा यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली होती. 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते मुदतवाढीवर होते. सध्या नड्डा केंद्र सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून कार्यरत आहेत. भाजपचे राष्ट्रीय रिटर्निंग ऑफिसर के. लक्ष्मण यांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी रोजी दुपारी 2 ते 4 या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील. त्याच दिवशी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. आवश्यक असल्यास 20 जानेवारी रोजी मतदान घेण्यात येईल आणि त्याच दिवशी अधिकृत निकाल जाहीर केला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात पार पडणार आहे. नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या संघटनात्मक रचनेत मोठे बदल अपेक्षित आहेत. आगामी काळात सुमारे 80 टक्के तरुण कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या जबाबदार्‍या देण्याचा प्रयत्न होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नव्या संघाची रचना पूर्ण होण्यासाठी साधारण सहा महिने लागू शकतात. मात्र महासचिव, सचिव आणि इतर प्रमुख पदांवर 50 वर्षांखालील नेत्यांना संधी देण्यावर भर राहील, असे वरिष्ठ नेत्यांकडून सूचित करण्यात आले आहे. पुढील वर्षी पाच राज्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर ही संघटनात्मक फेरबदल प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून, त्यानुसारच भाजपची आगामी रणनीती ठरणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.



 

नितीन नबीन ठरू शकतात सर्वात तरुण अध्यक्ष
नितीन नबीन यांचे वय सध्या 45 वर्षे असून, ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवडले गेले तर भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे पक्षात नेतृत्वाच्या नव्या पिढीला संधी मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

COMMENTS