Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत महायुतीचा विजय अटळ ः मुख्यमंत्री फडणवीस

ठाकरे बंधूंपासून मराठी मतदार दूर; मराठी माणसासाठी प्रत्यक्ष काम आम्ही केलेमुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी होणार्‍या मतदानाच्

नांदेडमध्ये विकास, भ्रष्टाचार आणि गुंडगिरीवर रणसंग्राम
शिवाजीनगरमध्ये भाजपला संमिश्र कौल : गड राखला, पण नेतृत्वाला हादरा
भिवंडीत महापालिकेत काँगे्रसची भाजपवर मात

ठाकरे बंधूंपासून मराठी मतदार दूर; मराठी माणसासाठी प्रत्यक्ष काम आम्ही केले
मुंबई : मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी होणार्‍या मतदानाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या विजयाचा ठाम विश्‍वास व्यक्त केला आहे. मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल आणि महायुती सत्तेवर येईल, असा पुनरुच्चार त्यांनी केला. निवडणूक निकालानंतर महाराष्ट्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामागे ठामपणे उभा आहे, हे संपूर्ण देशाला स्पष्ट होईल, असेही त्यांनी बुधवारी सांगितले.
माध्यमांशी संवाद साधतांना  मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली. मराठी विरुद्ध अमराठी असा मुद्दा उभा करून निवडणूक लढवण्याचा विरोधकांनी प्रयत्न केला, मात्र मराठी माणूस इतका संकुचित नाही, असे त्यांनी ठामपणे नमूद केले. मराठी भाषा, संस्कृती आणि प्रादेशिक अस्मितेचा आम्हाला अभिमान आहे, मात्र त्या अस्मितेचा अर्थ केवळ घोषणांपुरता मर्यादित नसून प्रत्यक्ष विकासाशी जोडलेला असतो, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या 25 वर्षांत मुंबईतून मोठ्या प्रमाणावर मराठी माणसाला शहराबाहेर जावे लागले. केवळ भाषणांमधून किंवा प्रतीकात्मक कृतीतून मराठी माणसाचा विकास होत नाही. एखाद्या परप्रांतीयावर हात उचलणे किंवा दहशत निर्माण करणे म्हणजे मराठी अस्मितेचे रक्षण नव्हे, हे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. फडणवीस यांनी सरकारच्या कामांचा दाखला देत सांगितले की, बीडीडी चाळीतील सुमारे 80 हजार मराठी कुटुंबांना हक्काची घरे देण्याचे काम महायुती सरकारने केले. अभ्युदय नगर, पत्राचाळ, विशाल सह्याद्री, मोतीलाल नगर यांसारख्या भागांतील मराठी कुटुंबे शहराबाहेर स्थलांतरित होण्याऐवजी त्याच परिसरात सुरक्षित घरे मिळवू शकली, हे खरे विकासाचे उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे मराठी तसेच अमराठी मतदारही विरोधकांच्या भूमिकेपासून दूर असल्याचा दावा त्यांनी केला. तामिळनाडूचे भाजप नेते अन्नामलाई यांनी मुंबईचा उल्लेख ‘बॉम्बे’ असा केल्याने निर्माण झालेल्या वादावरही मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. बोलताना जुन्या सवयीमुळे काही शब्द वापरले जातात, त्यामागे अपमानाचा हेतू नसतो, असे त्यांनी स्पष्ट केले. एखाद्या शब्दावरून वाद उभा करून परस्पर भाषिक समाजांमध्ये कटुता निर्माण करणे देशहिताचे नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली भाषा आणि संस्कृती जपण्यासोबतच इतर भारतीय भाषांचा सन्मान करण्याची शिकवण दिली असल्याचे त्यांनी सांगितले.

ठाकरेंसोबत युतीची शक्यता नाकारली
निवडणुकीनंतर भाजप ठाकरे गटासोबत युती करेल का, या प्रश्‍नावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी ठाम शब्दांत नकार दिला. आम्हाला कोणाशीही युती करण्याची गरज भासणार नाही, असे सांगत त्यांनी अशा कोणत्याही राजकीय समीकरणाची शक्यता नसल्याचे स्पष्ट केले. वैयक्तिक पातळीवर वैर नसले तरी राजकीय आघाडीची गरज नाही, असेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS