Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महापालिका निवडणुकीत आचारसंहिता पथकांची धडक कारवाई

441.24 लिटर दारू व 2.2 किलो गांजा जप्त नांदेड । प्रतिनिधी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत महापालिकेच्या

भाजपाच्या विकसित नांदेडसाठी घोषित केलेल्या निवडणूक संकल्पनाम्याप्रमाणे शहराच्या विकासासाठी हजार कोटींची गरज
महावितरणचा ’स्मार्ट’ कारभार, जनता अंधारात लाचार; किनवट-गोकुंद्यात ’मार्च एंड’चा फटका की नियोजनाचा अभाव?
पुण्याऐवजी हडपसर स्थानकावरच मराठवाड्यातील रेल्वे गाड्या थांबवण्यात येणार

441.24 लिटर दारू व 2.2 किलो गांजा जप्त
नांदेड । प्रतिनिधी
नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता कालावधीत महापालिकेच्या आचारसंहिता पथकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहकार्याने अवैध देशी व विदेशी मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 441.24 लिटर मद्य तसेच 2.2 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभाग, नांदेड यांनी दि. 15 डिसेंबर 2025 ते 11 जानेवारी 2026 या कालावधीत नांदेड शहर व जिल्ह्यात अवैध देशी-विदेशी मद्य विक्री व वाहतुकीविरोधात राबविलेल्या कारवाईत एकूण 5 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे पोलीस विभागामार्फत अवैध शस्त्रास्त्रविरोधी कारवाईअंतर्गत 1 पिस्तूल, 1 राऊंड, 4 खंजर व 7 तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच प्रतिबंधात्मक कारवाईअंतर्गत विविध कलमांखाली एकूण 929 व्यक्तींवर हद्दपार व तत्सम कारवाई करण्यात आलेली आहे. नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका निवडणूक विभागाने 7 भरारी पथके, 15 स्थिर सर्वेक्षण पथके, 7 व्हिडीओ सर्व्हिलन्स पथके तसेच 2 आचारसंहिता दक्षता पथके गठीत केली आहेत. या पथकांमार्फत संपूर्ण शहरावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून नाकाबंदी करून वाहनांची तपासणीही करण्यात येत आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार फिरती भरारी पथके शहरात चोवीस तास कार्यरत आहेत.
आचारसंहिता भंग करणार्‍यांवर कठोर कारवाई
महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारांची संख्या मोठी असून निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिला आहे.

COMMENTS