Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

मिरजगाव   : कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे दुसरे अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कर्जत येथे

फाळके’ कॉलेजमध्ये १२ वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप 
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रवळगावला बससेवा सुरू
टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान

मिरजगाव   : कर्जत तालुका साहित्यप्रेमी मंडळाच्या वतीने सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे दुसरे अखिल भारतीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले आहे. या संमेलनाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यंदा संमेलनाचे दुसरे वर्ष असून या निमित्ताने साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या साहित्यिकांना ‘सत्यशोधक डॉ. अण्णा भाऊ साठे साहित्य भूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी साहित्यिकांनी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रकाशित झालेल्या कथासंग्रह, कवितासंग्रह, कादंबरी, प्रवासवर्णन, अनुवादित पुस्तक, ऐतिहासिक, सामाजिक वा ललित साहित्य प्रकारातील प्रकाशित पुस्तकांच्या प्रत्येकी दोन प्रती पाठवाव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हे आवाहन संमेलनाचे आयोजक अध्यक्ष तानाजी डाडर, कार्याध्यक्ष सुनिल गाडे, उपाध्यक्ष देविदास राऊत, सचिव नवनाथ केंदळे, चंद्रकांत डोलारे, सचिन गायकवाड, डॉ. राजेंद्र पवार, ॲड. नितीन लोंढे, संजय शेलार, दत्ता घोडके, दिनेश आडागळे, प्रकाश सकट, अक्षय डाडर, विजय शिंदे, महेंद्र जगधने, राघू जगधने, प्रभाकर पवार व सतीश पवार आदींनी केले आहे. पुरस्कारासाठी पुस्तक पाठविण्याचा पत्ता : देविदास दशरथ राऊत, दीप निवास, विवेकानंद कॉलनी, पोस्ट ऑफिसच्या पाठीमागे, मिरजगाव, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर.

COMMENTS