Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुकडी कालव्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

कर्जत : तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी नवनाथ पंढरीनाथ नवले (वय ७०) यांचा कुकडी कालव्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१२) दोन वाजता घडली.  या घटनेने परिसरामध्ये हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत घडलेली घटना अशी की, सध्या कुकडी कालव्याला आवर्तन सुटले आहे. तालुक्यातील कालव्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे. शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, हरभरा यासह इतर पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असल्यामुळे सर्वत्र शेतकरी पिकास पाणी देत आहे. कोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी कर्मचारी असणारे नवनाथ पंढरीनाथ नवले हे शेतकरी कालव्यामध्ये पाय घसरून पाण्यामध्ये पडले. पाण्याचा प्रवाह वेगाने असल्यामुळे ते पाण्यात वाहून जात असताना काही अंतरावर दगडाच्या पोवळ मध्ये अडकले आणि पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान ही माहिती कळतच सरपंच युवराज शेळके यांच्यासह नागरिक तात्काळ मदतीसाठी गेले. काही युवकांनी पाण्यामध्ये धाडसाने उतरून त्यांचा मृतदेह शोधला आणि यानंतर पाण्याच्या बाहेर मृतदेह काढल्यानंतर शवाविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता, या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

महिला सफाई कर्मचाऱ्यांचा रोटरी क्लबतर्फे सन्मान
सायकल यात्रा एकतेचा संदेश देणारी: डॉ. कुलकर्णी
कारखान्यांचा धुराडे बंद; कर्जतकरांचा श्वास मोकळा

कर्जत : तालुक्यातील कोरेगाव येथील शेतकरी नवनाथ पंढरीनाथ नवले (वय ७०) यांचा कुकडी कालव्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.१२) दोन वाजता घडली.  या घटनेने परिसरामध्ये हळूहळू व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत घडलेली घटना अशी की, सध्या कुकडी कालव्याला आवर्तन सुटले आहे. तालुक्यातील कालव्यांमधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी वाहत आहे. शेतकऱ्यांना ज्वारी, गहू, हरभरा यासह इतर पिकांना सध्या पाण्याची आवश्यकता असल्यामुळे सर्वत्र शेतकरी पिकास पाणी देत आहे.

कोरेगाव ग्रामपंचायतीचे माजी कर्मचारी असणारे नवनाथ पंढरीनाथ नवले हे शेतकरी कालव्यामध्ये पाय घसरून पाण्यामध्ये पडले. पाण्याचा प्रवाह वेगाने असल्यामुळे ते पाण्यात वाहून जात असताना काही अंतरावर दगडाच्या पोवळ मध्ये अडकले आणि पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दरम्यान ही माहिती कळतच सरपंच युवराज शेळके यांच्यासह नागरिक तात्काळ मदतीसाठी गेले. काही युवकांनी पाण्यामध्ये धाडसाने उतरून त्यांचा मृतदेह शोधला आणि यानंतर पाण्याच्या बाहेर मृतदेह काढल्यानंतर शवाविच्छेदनासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आला होता, या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

COMMENTS