भातकुडगाव फाटा : शेवगावचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तहसीलदार आकाश दहादडे यांनी शेतकरी संघटनेचे नेते व धरणग्रस्त कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले पाटील यांच्या राज्ञा निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली. जायकवाडी जलाशयामुळे शेवगाव, पैठण, गंगापूर व नेवासा तालुक्यातील ११२ गावे विस्थापित झाली. विस्थापनानंतर अनेक कुटुंबांना प्रपंच उभा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून, पाच दशके उलटूनही रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना धरणग्रस्त कुटुंबे आजही सामोरे जात असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले. धरणग्रस्त कुटुंबांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष घालावे, अशी मागणी मच्छिंद्र आर्ले पाटील यांनी तहसीलदार दहादडे यांच्याकडे केली. धरणग्रस्तांचे प्रश्न शासनदरबारी अग्रक्रमाने मांडून त्यावर तोडगा काढावा, असा आग्रहही त्यांनी धरला. या भेटीदरम्यान आर्ले कुटुंबियांच्या वतीने तहसीलदार आकाश दहादडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कामगार तलाठी श्रद्धा तुपे (काळे), नरेंद्र ब्राम्हणे, मुक्तार शेख, आसाराम लोंढे, लक्ष्मण कोंडीराम लोढे, सुरेश लोढे, नारायण काळे, शेषराव पहिलवान, रमेश बडधे, गुलाब शेख, बादशहा शेख, शेरअली पठाण यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

भातकुडगाव फाटा : शेवगावचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले तहसीलदार आकाश दहादडे यांनी शेतकरी संघटनेचे नेते व धरणग्रस्त कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष मच्छिंद्र आर्ले पाटील यांच्या राज्ञा निवासस्थानी नुकतीच सदिच्छा भेट दिली.
जायकवाडी जलाशयामुळे शेवगाव, पैठण, गंगापूर व नेवासा तालुक्यातील ११२ गावे विस्थापित झाली. विस्थापनानंतर अनेक कुटुंबांना प्रपंच उभा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून, पाच दशके उलटूनही रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांना धरणग्रस्त कुटुंबे आजही सामोरे जात असल्याचे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
धरणग्रस्त कुटुंबांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रशासनाने विशेष लक्ष घालावे, अशी मागणी मच्छिंद्र आर्ले पाटील यांनी तहसीलदार दहादडे यांच्याकडे केली. धरणग्रस्तांचे प्रश्न शासनदरबारी अग्रक्रमाने मांडून त्यावर तोडगा काढावा, असा आग्रहही त्यांनी धरला.
या भेटीदरम्यान आर्ले कुटुंबियांच्या वतीने तहसीलदार आकाश दहादडे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी कामगार तलाठी श्रद्धा तुपे (काळे), नरेंद्र ब्राम्हणे, मुक्तार शेख, आसाराम लोंढे, लक्ष्मण कोंडीराम लोढे, सुरेश लोढे, नारायण काळे, शेषराव पहिलवान, रमेश बडधे, गुलाब शेख, बादशहा शेख, शेरअली पठाण यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

COMMENTS