Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोलेतील २१ खडी क्रशर केले सील  

कोट्यवधींचा महसूल बुडवला; तहसीलदारांची कारवाई अकोले : कोट्यवधी रुपयांचा शासन महसूल बुडवत सुरू असलेल्या अकोले तालुक्यातील तब्बल २१ स्टोन क्रशर व काही खाणपट्ट्यांवर महसूल विभागाने धडक कारवाई करत त्यांना सील केले. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या पथकाने खाणपट्ट्यांची तपासणी केली असता ईटीएस मोजणी, व्यापारी परवाना, इटीपी चलन आदी बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.  राष्ट्रीय हरित लवाद (दिल्ली) यांच्या आदेशानुसार पर्यावरण मंजुरीशिवाय गौणखनिज उत्खनन करता येत नाही. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या २०२० मधील निर्णयानुसार दगड खाणींना तात्पुरती परवानगी देण्यापूर्वी संबंधित सर्वे व गट नंबरसाठी पर्यावरण समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित खाणपट्टा व स्टोन क्रशरधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर न करता अवैध उत्खनन सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले.  परवानाधारकांनी ईटीएस मोजणी करून घेणे आवश्यक असताना ती करण्यात आलेली नव्हती. ईटीएस मोजणीसाठी उपअधीक्षक (भूमी अभिलेख) कार्यालयात चलनाद्वारे शुल्क भरून, ते सादर केल्यानंतरच तात्पुरता परवाना दिला जातो. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ईटीएस मोजणी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे पत्र संबंधित २१ स्टोन क्रशर व खाणपट्टेधारकांना देण्यात आले आहे.या कारवाईचा सविस्तर अहवाल जिल्हा गौणखनिज अधिकारी, अहिल्यानगर यांना पाठविण्यात आला आहे. या कारवाईत नाईकवाडी अमोल बाळासाहेब, शिवाजी पुंडलिक बोडके, सुनील बापू पवार, राजेंद्र राधु भडांगे, गोकुळ राजेश अरोटे, सुदाम किसन अरोटे, स्वप्नील सुभाष फापाळे, दत्तु लक्ष्मण संगभोर, गोविंद भिमाजी सदगिर, नितीन सुरेश नाईकवाडी, किसन लक्ष्मण सदगिर, सुमन विठ्ठल पाडेकर, बबन वाळीबा सदगिर, सचिन किसन सदगिर, सुनंदा बाळासाहेब धुमाळ, धनराज बाळासाहेब आरोटे, विशाल भाऊसाहेब शेणकर, रोहिणी गोरक्ष मालुंजकर, अंजली त्रिंबक राउत, शरद मनोहर रत्नपारखी, नितीन पंढरीनाथ मुर्तडक यांच्यावर कारवाई करण्यात आली. “अकोले तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करताना आढळलेल्या अनियमिततेबाबत नोटीस देऊन लेखी खुलासा मागविण्यात आला होता. मात्र मुदतीत समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. त्यामुळे शासन परिपत्रकानुसार ईटीएस मोजणी करून मोजणी नकाशा सादर होईपर्यंत खाणपट्टे व स्टोन क्रशर बंद करण्यात आले आहेत.” — किसन लोहरे, नायब तहसीलदार, अकोले

आढळवाडी येथील हरिनाम सप्ताहाची सांगता
लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या खुनांचा तीव्र धिक्कार
कंटेनरमधून गोवंश जनावरांची तस्करी

कोट्यवधींचा महसूल बुडवला; तहसीलदारांची कारवाई

अकोले : कोट्यवधी रुपयांचा शासन महसूल बुडवत सुरू असलेल्या अकोले तालुक्यातील तब्बल २१ स्टोन क्रशर व काही खाणपट्ट्यांवर महसूल विभागाने धडक कारवाई करत त्यांना सील केले. तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांच्या पथकाने खाणपट्ट्यांची तपासणी केली असता ईटीएस मोजणी, व्यापारी परवाना, इटीपी चलन आदी बाबींमध्ये गंभीर त्रुटी आढळून आल्या.

 राष्ट्रीय हरित लवाद (दिल्ली) यांच्या आदेशानुसार पर्यावरण मंजुरीशिवाय गौणखनिज उत्खनन करता येत नाही. तसेच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या २०२० मधील निर्णयानुसार दगड खाणींना तात्पुरती परवानगी देण्यापूर्वी संबंधित सर्वे व गट नंबरसाठी पर्यावरण समितीची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. मात्र संबंधित खाणपट्टा व स्टोन क्रशरधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर न करता अवैध उत्खनन सुरू ठेवल्याचे निदर्शनास आले.

 परवानाधारकांनी ईटीएस मोजणी करून घेणे आवश्यक असताना ती करण्यात आलेली नव्हती. ईटीएस मोजणीसाठी उपअधीक्षक (भूमी अभिलेख) कार्यालयात चलनाद्वारे शुल्क भरून, ते सादर केल्यानंतरच तात्पुरता परवाना दिला जातो. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंत ईटीएस मोजणी पूर्ण करण्याची दक्षता घ्यावी, असे पत्र संबंधित २१ स्टोन क्रशर व खाणपट्टेधारकांना देण्यात आले आहे.या कारवाईचा सविस्तर अहवाल जिल्हा गौणखनिज अधिकारी, अहिल्यानगर यांना पाठविण्यात आला आहे.

या कारवाईत नाईकवाडी अमोल बाळासाहेब, शिवाजी पुंडलिक बोडके, सुनील बापू पवार, राजेंद्र राधु भडांगे, गोकुळ राजेश अरोटे, सुदाम किसन अरोटे, स्वप्नील सुभाष फापाळे, दत्तु लक्ष्मण संगभोर, गोविंद भिमाजी सदगिर, नितीन सुरेश नाईकवाडी, किसन लक्ष्मण सदगिर, सुमन विठ्ठल पाडेकर, बबन वाळीबा सदगिर, सचिन किसन सदगिर, सुनंदा बाळासाहेब धुमाळ, धनराज बाळासाहेब आरोटे, विशाल भाऊसाहेब शेणकर, रोहिणी गोरक्ष मालुंजकर, अंजली त्रिंबक राउत, शरद मनोहर रत्नपारखी, नितीन पंढरीनाथ मुर्तडक यांच्यावर कारवाई करण्यात आली.

“अकोले तालुक्यातील खाणपट्ट्यांची तपासणी करताना आढळलेल्या अनियमिततेबाबत नोटीस देऊन लेखी खुलासा मागविण्यात आला होता. मात्र मुदतीत समाधानकारक उत्तर प्राप्त झाले नाही. त्यामुळे शासन परिपत्रकानुसार ईटीएस मोजणी करून मोजणी नकाशा सादर होईपर्यंत खाणपट्टे व स्टोन क्रशर बंद करण्यात आले आहेत.”

— किसन लोहरे, नायब तहसीलदार, अकोले

COMMENTS