Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सुनील गीते यांचा पत्रकारदिनी सन्मान

अकोले :  रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार सुनील गीते यांना ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. संपादक अभय सुपेकर, रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर, मानद सचिव रो.रेखा पटवर्धन, प्रकल्प सचिव रो.मकरंद चिंधडे, जनसंपर्क संचालक ऍड.रो.विद्युलता तातेड, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष डॉ. संतोष साबळे आदींसह रोटरी क्लबचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते. पत्रकार सुनील गीते हे 1991 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध दैनिकांत काम केले असून सध्या ते  दैनिक लोकमंथन या दैनिकात कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ कामाची दखल घेत रोटरी क्लब ऑफ नाशिकने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले. यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन संपादक अभय सुपेकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी अरुण मलानी, मुकुंद पिंगळे, सोमनाथ कोठुळे, अमित शिंदे, हितेश शहा, आसिफ सय्यद, आकाश खांडके, डॉ.विश्वासराव आरोटे, गायत्री जेऊघाले, भरत पगारे, दैनिक लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी सुनील गीते, मुकुंद बाविस्कर, मनोहर गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

रंधा येथे राबविले स्वच्छता अभियान
प्रत्येकाने उन्नत भारताचे स्वप्न पाहावे : न्या. कंकणवाडी
मुंबईत सभा; भारत-अमेरिका व्यापार कराराविरोधात किसान सभेची ‘आरपार’ आंदोलनाची घोषणा

अकोले :  रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या वतीने पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकार सुनील गीते यांना ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

संपादक अभय सुपेकर, रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष डॉ.गौरव सामनेरकर, मानद सचिव रो.रेखा पटवर्धन, प्रकल्प सचिव रो.मकरंद चिंधडे, जनसंपर्क संचालक ऍड.रो.विद्युलता तातेड, पुरस्कार निवड समिती अध्यक्ष डॉ. संतोष साबळे आदींसह रोटरी क्लबचे सदस्य व अनेक मान्यवर उपस्थित होते.

पत्रकार सुनील गीते हे 1991 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांनी विविध दैनिकांत काम केले असून सध्या ते  दैनिक लोकमंथन या दैनिकात कार्यरत आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ कामाची दखल घेत रोटरी क्लब ऑफ नाशिकने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरविले.

यावेळी जीवन गौरव पुरस्कार देऊन संपादक अभय सुपेकर यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला. यावेळी अरुण मलानी, मुकुंद पिंगळे, सोमनाथ कोठुळे, अमित शिंदे, हितेश शहा, आसिफ सय्यद, आकाश खांडके, डॉ.विश्वासराव आरोटे, गायत्री जेऊघाले, भरत पगारे, दैनिक लोकमंथनचे तालुका प्रतिनिधी सुनील गीते, मुकुंद बाविस्कर, मनोहर गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

COMMENTS