कोरोनाची आता देशालाच धडकी ; महाराष्ट्रापाठोपाठ अन्य राज्यांतही बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोरोनाची आता देशालाच धडकी ; महाराष्ट्रापाठोपाठ अन्य राज्यांतही बाधितांच्या संख्येत वेगाने वाढ

मुंबई, नवीदिल्लीः देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

महामार्गावर वाहतूक पोलिसांची हप्तेगिरी
उदयनराजेंच्या गाण्यावर सातारकर फिदा
*मराठवाडयात दोन तरूण शेतकर्‍यांच्या आत्महत्या l DAINIK LOKMNTHAN *

मुंबई, नवीदिल्लीः देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळत असल्याने राज्य टाळेबंदीच्या उंबरठ्यावर आहे; पण आता इतर राज्यांमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. महाराष्ट्रानंतर आता इतर राज्यांमध्येही कोरोना भयंकर रुप धारण करत असल्याचे नव्या आकडेवारीवरुन दिसून येत आहे. 

देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी महाराष्ट्रात निम्म्यापेक्षा अधिक रुग्ण आढळून येत असले, तरी आता दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत जात आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढीची अशीच परिस्थिती कायम राहिल्यास केंद्र सरकारसमोरील अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊवर टाळेबंदीची टांगती तलवार आहे. एकट्या लखनऊमध्ये दिवसागणिक चार हजार रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरातील आरोग्य व्यवस्थेवरही ताण वाढला आहे. अनेक रुग्णालयांमध्ये बेड्स अपुरे पडत आहेत. उत्तर प्रदेशात गेल्या 24 तासांत तब्बल 18 हजार 21 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. एका दिवसातील रुग्ण वाढीचा उत्तर प्रदेशचा हा सर्वाधिक आकडा नोंदवला गेला आहे. तसेच गेल्या 24 तासांत राज्यात 85 जणांचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. दिल्लीतही कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होताना दिसते आहे. दिल्लीत सोमवारी 11 हजाराहून अधिक नवे रुग्ण आढळले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे दिल्लीतही रात्रीची संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. यासोबत इतरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या 38 हजारांपेक्षा जास्त झाली असून रुग्णालयांमध्ये बेड्सची कमतरता पडत आहे. यामुळेच दिल्ली सरकारने 14 खासगी रुग्णालयांना पूर्णत: कोविड रुग्णांसाठी समर्पित करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे संकट असतानाही कुंभ मेळ्याचे आयोजन केल्याच्या मुद्द्यावर उत्तराखंड सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. उत्तराखंडमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उत्तराखंडमध्ये रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे. मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये तर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात गेल्या 24 तासांत सहा हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत, तर 37 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे भोपाळमध्ये 19 एप्रिलपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे, तर संपूर्ण राज्यात याआधीच रात्रीची संचारबंदी आणि वीकएंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. याशिवाय छिंदवाडा, ग्वाल्हेर यांसारख्या जिल्ह्यांमध्ये संपूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमधील सर्वात मोठ्या रुग्णालयात तर कोरोना रुग्णांचे बेड्स उपलब्ध नसल्याने हाल होत आहेत. या रुग्णालयात सध्या 1200 बेड्स रुग्णांनी भरले आहेत. त्यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयाबाहेर अ‍ॅम्ब्युलन्समध्येच ठेवण्याची वेळ आली आहे. अ‍ॅम्ब्युलन्समध्ये रुग्णांना ऑक्सिजन देण्याची वेळ ओढावली आहे. 

कोरोनावरील लसींच्या आयातीला मान्यता

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी रशियानंतर आता अमेरिका, जपान आणि ब्रिटनमधूनही लस आयात केली जाणार आहे. केंद्र सरकारकडून परदेशात विकसीत करण्यात आलेल्या लसी आयात करण्यात येणार आहेत. ’कोव्हॅक्सिन’, ’कोव्हिशिल्ड’ या ’मेड इन इंडिया’ लसीनंतर ’स्पुटनिक व्ही’ या पहिल्या परदेशी लसीला भारतात सोमवारी मंजुरी देण्यात आली. त्यानंतर आता इतर परदेशी लसींचीही भारतात आयात केली जाणार आहे. ’नॅशनल एक्सपर्ट ग्रुप ऑन व्हॅक्सीन अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19’ या तज्ज्ञांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

अगोदर 100 जणांवर होणार वापर

परदेशातून आयात केल्या जाणार्‍या लसीचा वापर अगोदर केवळ शंभर लोकांवर केला जाईल तसेच पुढचे सात दिवस त्यांच्यावर तज्ज्ञांचे लक्ष राहील. त्यानंतर या लसींचा वापर लसीकरण मोहिमेत केला जाईल.

COMMENTS