भातकुडगाव फाटा : जायकवाडी प्रकल्पामुळे (नाथसागर जलाशय) १९७० च्या दशकात शेवगाव तालुक्यातील अनेक गावे पूर्णतः किंवा अंशतः बाधित झाली होती, या पुनर्वसित गावठाणांमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. ६ जानेवारी २०२६ चे महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे या गावांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी सुमारे ५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या मागणीनुसार पुनर्वसित गावांमध्ये रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये मौजे सोनविहीर येथील सोनुबाई मंदिर ते पहिलवानबाबा मंदिर रस्ता (सा.क्र. ०/०० ते २/६२५ किमी) मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २ कोटी रुपये, मौजे कऱ्हेटाकळी अंतर्गत कऱ्हेटाकळी ते खानापूर लिफ्ट रस्ता (सा.क्र. ०/०० ते १/९४० किमी) कामासाठी १ कोटी ४५ लाख रुपये, मौजे लाखेफळ अंतर्गत लाखेफळ ते जुने दहिफळ रस्ता (सा.क्र. १/०५० ते २/६०० किमी) कामासाठी १ कोटी २१ लाख रुपये, तर मौजे खानापूर अंतर्गत गावांतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी २९ लाख ८८ हजार रुपये असा एकूण ४ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या ८ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश तातडीने देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. दरम्यान, या निधी मंजुरीबद्दल आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

भातकुडगाव फाटा : जायकवाडी प्रकल्पामुळे (नाथसागर जलाशय) १९७० च्या दशकात शेवगाव तालुक्यातील अनेक गावे पूर्णतः किंवा अंशतः बाधित झाली होती, या पुनर्वसित गावठाणांमध्ये आमदार मोनिका राजळे यांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली. ६ जानेवारी २०२६ चे महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयाप्रमाणे या गावांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी सुमारे ५ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
आमदार मोनिका राजळे यांच्या मागणीनुसार पुनर्वसित गावांमध्ये रस्ते मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी हा निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये मौजे सोनविहीर येथील सोनुबाई मंदिर ते पहिलवानबाबा मंदिर रस्ता (सा.क्र. ०/०० ते २/६२५ किमी) मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी २ कोटी रुपये, मौजे कऱ्हेटाकळी अंतर्गत कऱ्हेटाकळी ते खानापूर लिफ्ट रस्ता (सा.क्र. ०/०० ते १/९४० किमी) कामासाठी १ कोटी ४५ लाख रुपये, मौजे लाखेफळ अंतर्गत लाखेफळ ते जुने दहिफळ रस्ता (सा.क्र. १/०५० ते २/६०० किमी) कामासाठी १ कोटी २१ लाख रुपये, तर मौजे खानापूर अंतर्गत गावांतर्गत रस्त्यांच्या काँक्रीटीकरणासाठी २९ लाख ८८ हजार रुपये असा एकूण ४ कोटी ९७ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
आमदार मोनिका राजळे यांच्या ८ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पत्रान्वये या सर्व कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून, निविदा प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कामांचे कार्यारंभ आदेश तातडीने देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.
दरम्यान, या निधी मंजुरीबद्दल आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले.

COMMENTS