Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीडमध्ये महिला उद्योजकतेचा महाकुंभ!

’तेजस्विनी’ प्रदर्शनाला हजारो महिलांचा प्रतिसादबीड। प्रतिनिधीबीडच्या उद्योग क्षेत्रातील महिलांनी आपली ताकद ठसवून दाखवली आहे. तेजस्विनी ग्रुपच्या स

भोंदू बाबांपासून सावध राहा : अप्पर पोलीस अधीक्षक वाकचौरे
मुक्त विद्यापीठाचे सन – 2022 चे विशाखा काव्य पुरस्कार जाहीर
नवरात्र उत्सव धर्माचा नव्हे, बहुजनांचा!

तेजस्विनी’ प्रदर्शनाला हजारो महिलांचा प्रतिसाद
बीड। प्रतिनिधी
बीडच्या उद्योग क्षेत्रातील महिलांनी आपली ताकद ठसवून दाखवली आहे. तेजस्विनी ग्रुपच्या संचालिका सोनल अरविंदसिंह पाटील यांच्या कल्पकतेतून आयोजित महिला उद्योजकांचे भव्य प्रदर्शन यशस्वी ठरले. रामकृष्ण लॉन्स येथे पार पडलेल्या या प्रदर्शनात लाखोंची उलाढाल झाली आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाचा नवा पाया रुजला.
स्थानिकांबरोबरच पुणे, अकोला, लातूर, संभाजीनगर यांसारख्या शहरांतील महिला उद्योजिका या प्रदर्शनात सहभागी झाल्या. स्टॉल्सवर हाताने बनवलेली तोरणे, दागिने, मसाले, साड्या, गृहसजावटीची वस्तू, ऑरगॅनिक फूड, मशरूम आणि घरगुती पदार्थ यांचा समावेश होता. प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर समाजात योगदान देणार्‍या नवनिर्वाचित नगरसेवक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचा सोनल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामुळे तेजस्विनी ग्रुपने एक नवा आदर्श प्रस्थापित केला. मकर संक्रांतीच्या सणाचा लाभ घेत महिलांसाठी मोठी खरेदीची सोय केली गेली. संक्रांतीसाठी लागणारे वाण, तीळ-गूळ आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी तब्बल 5 ते 7 हजार महिलांनी प्रदर्शनाला भेट दिली. दिवसभर चाललेल्या प्रदर्शनात स्टॉलधारकांची मोठी विक्री झाली. अनेक उद्योजिकांनी एकाच दिवशी हजारो रुपयांची विक्री करून लाखोंची उलाढाल केली. पुणे व अकोल्याहून आलेल्या स्टॉलधारकांनी तेजस्विनी ग्रुपमुळे आम्हाला हक्काची बाजारपेठ मिळाली असे समाधान व्यक्त केले. महिलांनी आत्मनिर्भर व्हावे ही आमची जिद्द आहे. संक्रांतीच्या निमित्ताने महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळाले व समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, याचे समाधान मोठे आहे. शहरातील प्रतिष्ठीत नागरिकांनी भेट देऊन तेजस्विनी ग्रुपच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामुळे शेकडो महिला स्वकर्तृत्ववान बनल्या असून, सर्व स्तरातून याला अभिमानास्पद प्रतिसाद मिळाला आहे.

COMMENTS