Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद इलियास, सय्यद बासेद यांचा भव्य नागरी सत्कार

खादीम’ म्हणून जनतेची सेवा करणार - सय्यद इलियासबीड । प्रतिनिधीशहरातील प्रभाग क्र. 20 (इस्लामपुरा) येथील एम.आय.एम. पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद

लोकरंजनचे संपादक परमेश्वर सोळंके यांचा शाश्वती अर्बनतर्फे सत्कार
छत्रपती संभाजीनगर येथे ब्राह्मण महाअधिवेशनात नांदेडचे नगरसेवक आशिष नेरलकर यांचा सत्कार
पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचा माजलगाव पत्रकारांच्या वतीने सत्कार

खादीम’ म्हणून जनतेची सेवा करणार – सय्यद इलियास
बीड । प्रतिनिधी
शहरातील प्रभाग क्र. 20 (इस्लामपुरा) येथील एम.आय.एम. पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक सय्यद इलियास भाई आणि सय्यद बासेद भाई यांच्यासह समाजसेवक शेख नेहाल अहमद यांचा स्थानिक नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
नगरसेवक सय्यद इलियास यांनी यावेळी सांगितले, मी तुमचा नगरसेवक नाही, तर एक ’खादीम’ (सेवक) म्हणून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी अहोरात्र काम करेन. कार्यक्रमात मान्यवरांनी सय्यद बासेद यांच्या पक्षनिष्ठेचा गौरव केला. बासेद भाई अनेक वर्षांपासून एम.आय.एम. पक्षात सक्रिय असून, स्वतः उमेदवारीस पात्र असतानाही पक्षाच्या आदेशानुसार तिकीट दुसर्‍या उमेदवाराला दिले. या निस्वार्थी निर्णयामुळे प्रभागात पक्षाचा विजय सुलभ झाला, असे मान्यवरांनी सांगितले. समाजसेवक शेख नेहाल अहमद यांच्या सामाजिक कार्याची देखील यावेळी दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना सय्यद इलियास म्हणाले, जनतेने दिलेला कौल माझ्यासाठी जबाबदारीची जाणीव करून देतो. प्रभागातील कामांबाबत तक्रारीला जागा उरणार नाही. जे नाराज आहेत, त्यांचेही मन जिंकून प्रभागाच्या विकासकामांत सहभागी करू. सत्कारास शेख रईस भाई, सय्यद जावेद भाई, शेख शफीक भाई, अहमद भाई, शेख समीर मामू, मुन्ना पठान, मुबीन भाई, नसीर भाई, समीर भाई, शेख सादेक भाई, सैय्यद रईस, शेख सुल्तान भाई, शेख अबुजर भाई, रहीम अतार, अजहर पठान, सैय्यद इब्राहिम भाई, शेख महबूब भाई आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS