Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गणेश मुद्दमेने साकारली पुरंदर किल्ल्याची प्रतिकृती

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी - तळेगाव दे.येथील ईतिहास प्रेमी गणेश प्रमोद मुद्दमे या बालकाने त्याच्या परसबागेत पुरंदर किल्ला साकारला आहे. गणेशने पुरंदर

लातूर जिल्ह्यातील अवकाळी नुकसानीचे पंचनामे पूर्ण; आता मदत केव्हा मिळणार?
निलंगा येथे मिलींदनगरातील स्मशानभूमीची दूरवस्था
अनेर धरणा मधून, अनेर नदीत पाणी सोडण्यात यावे यासाठी बऱ्हाणपूर अंकलेश्वर हायवे वरती रास्ता रोको आंदोलन

शिरूर अनंतपाळ प्रतिनिधी – तळेगाव दे.येथील ईतिहास प्रेमी गणेश प्रमोद मुद्दमे या बालकाने त्याच्या परसबागेत पुरंदर किल्ला साकारला आहे. गणेशने पुरंदर किल्ला साकारताना छत्रपती संभाजी महाराजांच्या काळातील महत्त्वाच्या घटनाकृम मांडला असून त्याच्या या ऐतिहासिक कलाकृतीची सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.
शिरूर अनंतपाळ तालुुक्यातील तळेगाव दे. येथील जि.प. शाळेत नववीच्या वर्गात शिकणा-या गणेश प्रमोद मुद्दमे याला शिक्षणासह इतिहास अभ्यास करण्याची आवड आहे. यातून त्याने कोरोना काळात शिवरायांचा इतिहास आपल्या कलाकृतीतून मांडला होता. तर आता छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त किल्ले पुरंदर सह त्यावेळच्या घटना परसबागेत रेखाटून संभाजीराजांना मानाचा मुजरा केला आहे. शिरूर अनंतपाळ शहरापासून जवळ असलेल्या तळेगाव दे. येथे सामान्य कुटूंबात जन्मलेल्या गणेशला लहानपणांपासूनच इतिहासाची आवड आहे. त्यात छ्त्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजीराजांच्या कार्याचा त्याच्यावर मोठा पगडा आहे. त्यामुळे तो छत्रपतींच्या कार्याला उजाळा मिळावा म्हणून आपल्या परसबागेत दगड, मातीसह ईतर आवश्यक वस्तुपासून तो गड किल्ले साकारून त्या काळातील घटना जीवंत करण्याचा प्रयत्न करतो. छ्त्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त किल्ले पुरंदर सह त्यांचा ईतिहास साकारला आहे. या कलाकृतीने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS