Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरेंना धक्का; माजी महापौर शुभा राऊळ यांचा राजीनामा

भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ; भाजप नेते शेलारांची घेतली भेटमुंबई : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखा

शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांना पुन्हा निवडून येऊ देणार नाही
विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका घ्या : उद्धव ठाकरे
Sangamner : बोगस शिधापत्रिका प्रकरण शिवसेनेच्या विद्यमान पदाधिकाऱ्याला भोवणार?

भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता ; भाजप नेते शेलारांची घेतली भेट
मुंबई : महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं चित्र आहे. मुंबईच्या माजी महापौर तसेच शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षा असलेल्या शुभा राऊळ यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला आहे.
शुभा राऊळ यांनी केवळ शिव आरोग्य सेनेच्या अध्यक्षपदाचाच नव्हे, तर शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांनी हा निर्णय अतिशय संक्षिप्त शब्दांत कळवला असून त्यांच्या नाराजीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, त्यांच्या या अचानक निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान, राजीनाम्यानंतर शुभा राऊळ यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. आमदार प्रवीण दरेकर यांच्या निवासस्थानी ही भेट झाल्याचं सांगितलं जात असून, त्यामुळे राऊळ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या शक्यता बळावल्या आहेत. शुभा राऊळ या ठाकरे गटातील प्रभावी महिला नेत्या म्हणून ओळखल्या जातात. अशा वेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी संयुक्त वचननामा जाहीर केलेल्या दिवशीच त्यांचा राजीनामा समोर येणं, हा योगायोग मानायचा की राजकीय संकेत, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

COMMENTS